जिद्दीने ध्येयाचा पाठलाग केल्यास सुयश: कुणालसिंह नाईक निंबाळकर., एस पी वाय हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांना निरोप व सेवापूर्ती समारंभ.





यड्राव: दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे. या परीक्षे त मिळालेल्या गुणांवरच पुढील शिक्षण अवलंबून आहे, यामुळे विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक भवितव्य भवितव्याचे ध्येय समोर ठेवून जिद्दीने त्याचा पाठलाग केल्यास निश्चित आपल्या जीवनात स्थैर्य निर्माण होते असे प्रतिपादन सरपंच कुणालसिंह नाईक निंबाळकर यांनी केले 
      ते येथील शामराव पाटील यड्रावकर हायस्कूलमध्ये आयोजित दहावी विद्यार्थ्यांना निरोप समारंभ व तात्यासाहेब भतगे यांच्या सेवापूर्ती या संयुक्त कार्यक्रमात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
      विद्यालयामध्ये 32 वर्षे सेवा केलेल्या तात्यासाहेब भतगे यांचा सेवापुर्ती निमित्त  सपत्नीक सत्कार  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
     या प्रसंगी घनश्याम कुंभार , भरत माणगावे  ,श्रावणी कांबळे , बी . डी . ढोले . एस . के . मालगावे,व्ही . बी . दुर्गार्डे, अनघा क्वाणे, बळवंत  कुंभार यांनी मनोगते व्यक्त केली यावेळी विद्यार्थ्यांनी विद्यालयास भेटवस्तू देऊन कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल व्यक्त केलेल्या आदरयुक्त भावनामुळे उपस्थितांच्या डोळ्यांमधून अश्रू आले.
   या कार्यक्रमास उद्योजक विजय माणगावे  ,  शैलजा  माणगावे ,   ,   संजय  क्वाणे , बी . बी . गुरव , बाबगोंड  पाटील ,  बाबासो  कुरडे , माळी मॅडम, श्रीदेवी क्वाणे ,  विलास  पाटील , यांच्यासह मानगावे व भतगे परिवार उपस्थित होता.
                       स्वागत  व  प्रास्ताविक  मुख्याध्यापिका  मनिषा पाटील यांनी केले.  पाहुण्यांची ओळख  अण्णासाहेब क्वाणे यांनी करून दिली.   सूत्रसंचलन  श्वेता खाडे यांनी केले  व भाऊसो कांबळे यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.