बांधकाम कामगारांचे पोर्टल सुरू आयटकच्या आंदोलनाला यश कॉ. आनंदा गुरव.
इचलकरंजी प्रतिनिधी - महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांची ऑनलाइन प्रक्रिया वैयक्तिक ठेकेदाराला देऊन सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. तो महाराष्ट्रातील प्रचंड आंदोलनामुळे मागे घ्यावा पाडला त्याबद्दल महाराष्ट्रातील सर्वच आंदोलकांचे व सरकारचे सकारात्मक निर्णय घेतले बद्दल सरकारचे स्वागत महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कामगार नेते कॉ. आनंदा गुरव यांनी मांडले
. बांधकाम कामगारांकरिता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना झाली आहे या मंडळांतर्गत नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजना लागू आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी तालुकास्तरावर सुविधा केंद्र काढून कामगारांची प्रचंड गैरसोय केली होती या सुविधा केंद्रावर पहाटेपासूनच रांगा लागत होत्या कामगारांचे प्रचंड नुकसान होत होते ही सर्व बाब मंत्री महोदय व प्रशासनाला आंदोलन करून लक्षात आणून दिली. या आंदोलनाची आयटकने दोन डिसेंबर रोजी पहीला आवाज उठवून राज्यभर आंदोलन केले आंदोलनाचा आयटक सह इतर संघटनांचा महाराष्ट्रभर प्रचंड रेटा सुरू होता . यामध्ये इचलकरंजी व कोल्हापूरातील कृती समीतीही अग्रभागी होती या आंदोलना पुढे प्रशासन व सरकारचे सकारात्मक निर्णय घेऊन सदरचा निर्णय रद्द करून पूर्वीप्रमाणे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. पण महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे विनाकारण पैसै उधळणेचे काम सुरू आहे. या पैश्यावर अनेक ठेकेदार पोसले जातात या विरूद्ध आंदोलन सुरुच राहील असे पत्रकात शेवटी कॉ.आनंदा गुरव म्हणाले.
टिप्पण्या