जीबीसी सिंड्रोम रोगाने निपाणी तालुक्यातील पहिला बळी , - ढोणेवाडीतील घटना,

बोरगांव/प्रतिनिधी. 
ढोणेवाडी तालुका निपाणी येथील  बाळगोंडा भाऊसो पाटील  वय वर्ष  ६४ व  यांना आठ दिवसांपूर्वी जीबीसी  सिंड्रोम रोगाची लागण झाली होती  त्यांच्यावर कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे jरुग्णालयात   उपचार सुरू असतानाच शनिवार दि.१५ रोजी त्यांचा मृत्यू झाला . निपाणी तालुक्यातील जीबीसी सिंड्रोमचा पहिली बळी गेल्याने तालुक्यासह पंचक्रोशीत  एकच खळबळ माजली आहे..
      गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) विषाणू  हा आजार राष्ट्रीय पातळीवर असताना त्याचे  लोन ग्रामीण भागा पर्यंत  पसरलेले आहे. .  ढोणे वाडी येथील चौथी वर्गात शिकणाऱ्या एका  विद्यार्थ्याला   जीबीसीची लक्षणे   दिसल्याने त्याला कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करुन  उपचार सुरू असतानाच  ढोणेवाडी वार्ड नंबर तीन मधील एका ६४ वर्षे इसमाला जीबीसी रोगाची लक्षणे आढळल्याने दि.८  रोजी खाजगी  दवाखान्यातून कोल्हापूरच्या शासकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या वर आठ दिवस उपचार सुरू असतानाच शनिवारी निधन झाले . त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.
ढोणेवाडी येथे जी बी सी सिड्रोम रोगाने वृध्द वारल्याने परीसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. व भीतीचे वातावरण पसरले आहे.संबधीत रोग्यावर त्वरित उपचार व्हावा अशी नागरिकांतून बोलले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.