राज्यस्तरीय आदर्श स्त्री पुरस्कारासाठी सौ. मिनाक्षी आनंदा तुकशेट्टी यांची गौरवपूर्ण निवड!
इचलकरंजी : पोलिस मित्र असोसिएशन व वेध फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श स्त्री पुरस्कार यंदा सौ. मिनाक्षी आनंदा तुकशेट्टी (रा. शिंदे मळा, खोतवाडी) यांना जाहीर झाला आहे.
सामाजिक कार्यात सातत्याने अग्रेसर असलेल्या आणि आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिलांना दरवर्षी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या पुरस्काराने सन्मानित केले जाते. यावर्षी "आदर्श राणी लक्ष्मीबाई पुरस्कार" सौ. तुकशेट्टी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा दि. ९ मार्च २०२५ रोजी सायं. ५:०० वा. श्रीमंत नारायण घोरपडे नाट्यगृह, इचलकरंजी येथे संपन्न होणार आहे.
सौ. मिनाक्षी आनंदा तुकशेट्टी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!
टिप्पण्या