सहारा फाउंडेशन राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा संपन्न.

कबनूर: सामाजिक बांधिलकीचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा देण्यासाठी सहारा फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतात. समाजातील विविध स्तरांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांना भावी कार्याची ऊर्जा मिळावी, हा पुरस्कार वितरणामागील उद्देश आहे, असे प्रतिपादन पी. एम. पाटील यांनी केले. ते सहारा फाउंडेशन तसेच सहारा ग्रुप ऑफ बिझनेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित 2025 च्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांनी सहारा फाउंडेशन केवळ पुरस्कार देणारी संस्था नसून श्रमजीवी, कष्टकरी, 12 बलुतेदार तसेच इतर घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्काराद्वारे शाबासकी देणे ही मोठी गोष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास महेश कांबळे, सचिन सुतार, प्रमोद पाटील, अनिकेत कांबळे, पुण्याच्या पत्रकार प्रतिभाताई पाटील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी सागर जाधव, रेश्मा सनदी यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. तसेच, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश केणी, बाळासो शिंदे, मुनीर जमादार, उपसरपंच सुधीर लिगाडे, समीर जमादार, जैद भोकरे, युसूफ मकानदार, शहानूर कमालश्या आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्रभरातून आलेल्या गुणवंत व्यक्तींचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिझवाना मकानदार यांनी केले. स्वागत ऍड. परवेझ सनदी यांनी, प्रास्ताविक पापालाल सनदी यांनी तर आभार उमेश जाधव यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.