विद्यार्थ्यांनो, न्यूनगंड दूर करण्यासाठी स्पर्धा परीक्षांचा सराव करा. एम. बी. केरूरे यांचे प्रतिपादन. मलिकवाडला महाशिवरात्रीनिमित्त परीक्षा

प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

मलिकवाड, तालुका चिकोडी येथील शहरी भागापुरती मर्यादित राहिलेली स्पर्धा परीक्षा ग्रामीण भागात रूजविण्याचे काम अतिशय उपयुक्त आहे. विद्याथ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन न्यूनगंड दूर करावा. स्पर्धेत सहभागी होणे हेही विजयासारखेच आहे, असे मत सरकारी माध्यमिक शाळेचे शिक्षक एम. बी. केरूरे यांनी व्यक्त केले.
येथे महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिर जीर्णोद्धार समिती व ग्रामस्थांच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षेचे उ‌द्घाटन करून ते बोलत होते. श्री. केरूरे पुढे म्हणाले, मलिकवाडसारख्या ग्रामीण भागात मंदिर समितीने अशा स्पर्धा परीक्षा सुरू करून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला आहे. या परीक्षांना गावपातळीवर स्थान देऊन येथील विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन

करावे, यासाठी त्यांचे प्रयत्न मोलाचे आहेत. महाशिवरात्री म्हणजे केवळ यात्रा न करता त्यातून विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचे काम या समितीने केले आहे. मलिकवाड येथील महाशिवरात्री म्हणजे स्पर्धा परीक्षा हे समीकरण झाले आहे.

यावेळी समितीचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील, कागवाड तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एम. जी. संकपाळ, शंकर मंगावे, सुभाष संकपाळ, संतोष मोडें, राजू मुल्ला, सुधीर पाटील,विनोद पाटील, अप्पासाहेब संकपाळ, निखिल कुडचे, बाळू पाटील, अनिल मंगावे, काशीनाथ कुडचे यांच्यासह मंदिर समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. चंद्रकांत शिरोळे यांनी प्रास्ताविक केले. महांतेश पाटील यांनी परीक्षेचे स्वरूप स्पष्ट केले. स्पर्धेचे यंदाचे हे दहावे वर्ष आहे. यावर्षी तीन गटांत १५२ परीक्षार्थी बसले होते. इंग्रजी, मराठी व कनड अशा तीन माध्यमातून या परीक्षा घेण्यात आल्या. विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.