न्यू हायस्कूल मध्ये 10 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 
                          
सेलू : दि.10 येथील न्यू हायस्कूल व उच्च माध्यमिक विद्यालय, सेलू येथे इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांनसाठी  निरोप समारंभाचे 9 वी च्या विद्यार्थांनी आयोजन केले होते. कै विनायकराव पाटील व सरस्वतीच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. कार्य क्रमाचे अध्यक्ष मुख्या ध्यापक के व्ही मोरे तसेच पर्यवेक्षक धनंजय भागवत, दिन
कर नखाते  शरद मगर, भाऊसाहेब निकम आदींची या कार्यक्रमा स प्रमुख उपस्थिती होती. करिष्मा ढेंबरे या विद्यार्थिनीने स्वागत गीत गायले. कार्यक्रमा चे प्रास्ताविक रामेश्वर गाडेकर यांनी केले. याप्रसंगी रेणुका ताठे, ज्ञानेश्वरी गडदे, मयुरी हजारे, प्रतिक्षा खरात व त्रिरत्न सावंत या विद्यार्थ्यांनीआपले मनोगत भाषणातून मांडले. तसेच एस टी नागरे, ए एस सावंत, जि के तोटेवाड, डी सी सोळंके,डी एस मोरे, आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर के व्ही मोरे, धनंजय भागवत यांनी परीक्षेसंबंधी महत्वा च्या सूचना व परीक्षे साठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन रूपाली शिंदे केले तर आभार जी एस रोंटेवाड यांनी मानले. कार्यक्रमास इयत्ता 9 व 10 वीचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण काष्टे व विष्णू गजमल यांनी प्रयत्न केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.