स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे मोठ्या उत्सवात वाघजाई नगर परिसरात शिवजयंती उत्सव साजरा.

19/02/2025 रोजी स्वराज्य प्रतिष्ठान तर्फे शिवजयंती उत्सव आयोजित करण्यात आले आयोजक नवनाथ शिंदे व त्यांचे सहकारी यांनी मिळून  शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले. 
वाघजाई मंदिर ते सच्यामाता  मंदिर पाणी टाकीपर्यंत वाजत गाजत  छत्रपती शिवाजी महाराजाची मूर्ती रथामध्ये ठेऊन मिरवणूक काढण्यात आली.
 .मिरवणुकीची सुरुवातीची आरती आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. शरद झिने साहेब तसेच पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण डोईफोडे साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश (भाऊ )वनशिव त्याचबरोबर त्यांचे सहकारी अमर चाकोरे, सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली जाधव, डॉ.सुचेता भालेराव,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे,  
  झेप फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य संस्थापक सचिव शिवाजी मुसळे, शहाजी मुसळे,पत्रकार कांताभाऊ राठोड, भास्कर शिंदे, प्रकाश कर्चे ,अक्षय पवार, विनायक घुले स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष नवनाथ शिंदे , सुरज पाटील ,करण रावल,यश दिघे, विशाल धेंडुळे, वैभव नाकाडे,ओम भाग्यवंत,वेदांत गोरे, श्रीनिवास कट्टा इतर कार्यकर्ते व माता-भगिनी व वाघजाई नगर परिसरातील नागरिक यांच्या उपस्थितीत घेण्यात आली .यावेळी मान्यवरांना छत्रपती शिवाजी महाराजाचा फोटो, शाल ,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मिरवणूक  संध्याकाळी 6:30  वाजता सुरू करण्यात आली तसेच मिरवणूक  दरम्यान कात्रज, आंबेगाव, दत्तनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते स्वराज (भौया) नमेश बाबर , विठ्ठल चोरघे, प्रकाश खुटवड, आकाश थोरात, विविध भागातील मान्यवरांनी भेट दिली त्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणा देत पारंपारिक पद्धतीने नृत्य कला सादर करत  मिरवणूक  सच्यामाता मंदिर पाणी टाकी येथे रात्री दहा वाजता याचा शेवट करण्यात आला मिरूणूक चांगल्या पद्धतीने पार पडली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.