शामराव पाटील यड्रावकर हायस्कूलमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
यड्राव: विद्यार्थी दशेमध्येच विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक ध्येय निश्चित करायला त्या दृष्टीने केलेले वाटचाल निश्चितपणे आपले ध्येयपूर्ती होतें.यापूर्वीची शिक्षण पद्धती व आत्ताची शिक्षण पद्धती मध्ये अमोलाग्रह बदल झाला ते विद्यार्थ्यांनी समजून घेऊन ज्ञान आत्मसात करणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन राष्ट्रसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष उद्योगपती विश्वजीत कांबळे यांनी केले.
ते येथील शामराव पाटील यड्रावकर हायस्कूल मध्ये राष्ट्रसेवा फाउंडेशन इचलकरंजी त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
विद्यार्थ्याना फाउंडेशन च्या वतीने शिक्षण साहित्य देण्यात आले . तसेच महानगरपालिका कर आयुक्त सोमनाथ कांबळे, यांनी मनोगत व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका मनीषा पाटील यांनी केले . याप्रसंगी अमित कांबळे, अनिकेत कांबळे, साहिल शेवाळे, विनायक साळुंखे उपस्थित होते. . हेमांगी कांबळे यांनी सूत्रसंचलन केले व भास्कर ढोले यांनी आभार व्यक्त केले.
फोटो ओळी: यड्राव(ता शिरोळ) येथील एस पी वाय हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना विश्वजीत कांबळे, सोमनाथ कांबळे,अमित कांबळे, अनिकेत कांबळे, साहिल शेवाळे, विनायक साळुंखे,मनीषा पाटील राज्यसमान्यावर उपस्थित होते
टिप्पण्या