मलिकवाड येथे संत रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी.भजनसेवेसह, महाप्रसादाचे वाटप

मलिकवाड, तालुका चिकोडी येथील समस्त चर्मकार समाज बांधवांच्या वतीने संत रोहिदास महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी ज्येष्ठ माजी सैनिक सदाशिव वंजिरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ वाढविले. चर्मकार समाजाचे अध्यक्ष निवृत्ती वंजिरे,उपाध्यक्ष दिपक वंजिरे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर टाळ मृदुंगाच्या गजरात भक्तीमय वातावरणात दोन तास भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रत्येक वर्षी चर्मकार समाजाकडून विविध कार्यक्रम राबविले जातात. 

यावेळी तुकाराम वंजिरे विष्णू वंजिरे,
रामा वंजिरे, श्याम वंजिरे, सुभाष वंजिरे, प्रकाश वंजिरे, पांडुरंग वंजिरे, राजू वंजिरे, सुनील पवार, मंगेश वंजिरे, रुद्र वंजिरे, विद्या वंजिरे, स्वाती वंजिरे,मंगल वंजिरे, लक्ष्मी वंजिरे, सुवर्णा वंजिरे, पुतळाबाई वंजिरे, रुक्मिणी वंजिरे, सरिता वंजिरे, उज्वला वंजिरे यांच्यासह, महिला, समाजबांधव व नागरिक उपस्थित होते. विशालक्रांती न्यूजसाठी अमर माने मलिकवाड.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.