कुरुंदवाड येथे युवकांकडून व्हॅलेंटाईन ला फाटा देत "रोटी डे" साजरा

कोल्हापूर प्रतिनिधी:रियाज जैनापुरे
नवतरुणांची महाराष्ट्राची सामाजिक बांधिलकीची संस्कृती जपण्यासाठी, सेवेसाठीची प्रामाणिक धडपड.
पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असणारा "व्हॅलेंटाईन" हा शब्द अलीकडे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात रुजत असल्याचे चित्र आहे. फेब्रुवारी चा दुसरा आठवडा जगभर *"व्हॅलेंटाईन वीक"* म्हणून साजरा होतो. त्या अनुषंगाने सात ते चौदा तारखेपर्यंत रोज डे प्रपोस डे असे नानाविध दिवस साजरे केले जातात. या दरम्यान तरुणाईकडून प्रेम प्रदर्शित करण्यापायी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च केला जातो. तर काही तरुण याच दरम्यान याला विकृतीचा रंग देत असतात. त्यामुळेच समाजात मुलींच्या छेडछाडीचे प्रकार, हाणामारीचे प्रसंग ही मोठ्या प्रमाणात या कालावधीत पाहायला मिळतात.नवतरुण उत्साहाच्या भरात कधी अपराधी बनतात व आपल्या आयुष्याला वेगळं वळण देऊन बसतात हे त्यांना देखील कळत नाही.एकीकडे अश्या विकृतीकडे मोठा वर्ग वाहत जात असताना समाजातील काही सुज्ञ तरुण मात्र याला अपवाद ठरतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची सेवेची, करुणेची आणि सामाजिक बांधिलकीची संस्कृती रुजवण्याला हे तरुण प्राधान्य प्राधान्य देतात. असेच काही नवतरुण हातकणंगले आणि कुरुंदवाड येथे इतरांना आदर्श ठरतील असे उपक्रम राबवतात.१४ फेब्रुवारी निमित्त हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालय आणि कुरुंदवाड येथील सहकार भूषण एस के पाटील काॅलेज येथील आजी माजी विद्यार्थी एकत्र येऊन व्हॅलेंटाईन ला फाटा देत दरवर्षी त्या दिवशी *"रोटी डे"* हा अभिनव उपक्रम राबवतात. आपल्या या संवेदनशील कृतीतून ते खऱ्या अर्थाने आज एक उत्तम आदर्श महाराष्ट्रातील प्रत्येक महाविद्यालयासमोर निर्माण करून,आपली सेवेची संस्कृती जपण्याचा संदेश ही या माध्यमातून ते देऊ पाहत आहेत.महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग, छत्रपती राजर्षी शाहू विद्यार्थी परिषद व आय. एम. कलाम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दोन्ही महाविद्यालयात दरवर्षी 'व्हॅलेंटाईन डे'ऐवजी रोटी डे साजरा करून एक आदर्शवत उपक्रम राबवला जात आहे.प्रेमाचा दिवस म्हणून सामाजिक बांधिलकी जोपासत समाजातील उपेक्षित,वंचित, पीडित,दुर्बल घटकांवर जिव्हाळा,माया व प्रेम व्यक्त करत सलग आठव्या वर्षी ही महाविद्यालयात हा उपक्रम राबविण्यात आला.प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी ही १४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे ऐवजी "रोटी डे"साजरा करण्याचा मानस तरुणाई ने केला.रोटी डे निमित्त समाजातील दुर्बलांना मदत करण्याच्या उद्देशाने अन्नधान्य, फळे, शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत जमा करावे, असे आवाहन केले. त्यास प्रतिसाद देत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक,इतर कर्मचारी व नागरिकांनी मदत जमा केली.यातून समाजातील उपेक्षितांप्रती आपुलकी दाखवत रोटी डे उपक्रमात सहभाग दाखवला. रोटी डे निमित्त जमा झालेले अन्नधान्य, फळे, कपडे व रोख रक्कम चिपरी येथील डीएमसी अनाथ आश्रमास व घोसरवाड येथील जानकी वॄध्दाआश्रमास सुपूर्द केली. यावेळी उपस्थित असणारे सर्वच युवक युवती भावनिक झाले होते. यापुढेही शक्य ती मदत वेळोवेळी अश्या ठिकाणी देण्याची भावना ही त्यांनी व्यक्त केली.सदर उपक्रमासाठी अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरंजन कुलकर्णी,राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.डॉ.अमोल महाजन, प्रा. डॉ.तेलसिंगे मॅडम, प्रा.डॉ.विकास विधाते सर, तसेच एस के पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस.कदम सर,राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा.डॉ. व्ही.एस.मुन सर,डॉ.सौ.मिनचेकर मॅडम, छत्रपती राजर्षी शाहू विद्यार्थी परिषद चे यासीन आवटी,अमन पटेल, आय.एम.कलाम फाउंडेशनचे अध्यक्ष अनिस मुजावर, ऋषिकेश नांगुरे,इम्रान मुजावर, आयुब मांगुरे यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.सदर उपक्रमात डांगे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे मनोज पोवार, हर्षवर्धन परीट,शिवराज कुण्णूरे,कविता पुजारी,दिव्या माने,साक्षी टारे,श्रद्धा पुजारी, स्वरांजली पोतदार,श्रद्धा पाटील,मयुरी कोळी,संध्या कोळी,वैष्णवी विटेकरी, सानिया मुजावर,हर्षदा पोतदार आदींचा सहभाग होता.तसेच एस के पाटील कॉलेज चे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, विद्यार्थीनी मुशीरीन पटेल, सनोबर ढालाईत,काजल भंठारे,श्रद्‌धा कांबळे,अंकिता हिंगमीरे,आकांक्षा खोत, अदित्य तराळ,तृषा गायकवाड, मुयुरी शिंदे,सुहानी कांबळे, मधुरी पुजारी मॅडम,जोया  हुकरे,गणेश कतिरे,बवेता जमदाडे,प्रीती कांबळे, अलविरा पकाली,सानिका कुंभार,ऐश्वर्या राजपूत,कोमल कोळी,मेघा काठे,ओंकार लाटवडे,सोनाली पाटील, आदित्य गरसे,सुमित शिंदे, ओंकार पाटील,परिमल सुतार, साक्षी तिप्पनव्वर,पार्थ पोवार, प्रर्णव कुंभार,ऋतुजा शंभुशेट्टी, ओंकार कोळी,साक्षी बिरणगे, पृथ्वीराज रजपूत, महेंद्र रजपूत, अक्षय खोमणे प्रियांका पाटील, स्नेहा बिरंनगे आदींनी सक्रिय सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी केला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.