देशभक्त मानवतावादी चळवळीच्या वतीने शिव संविधान जागर

कुरुंदवाड/प्रतिनिधी:
  शिवजयंती आणि संविधानbbb अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशभक्त मानवतावादी चळवळीच्या वतीने विविध व्यक्ती व संघटनांना संविधानाबाबत जागृती पत्रके आणि संविधान परिचय पुस्तिका यांचे वाटप करण्यात आले.
     तेरवाड (ता. शिरोळ) येथे कै. गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशन आणि ग्रामपंचायत तेरवाड यांच्यावतीने ग्रामपंचायत सदस्यांना शिव संविधान पत्रके देण्यात आली. याप्रसंगी संविधान प्रास्ताविकीचे वाचन करण्यात आले. जयसिंगपूर महावितरण कार्यालयामध्ये उमेश आवळे यांनी शिव संविधान पत्रकाचे वितरण करून रयतेचा राजा छ. शिवाजी महाराज व संविधानिक मूल्ये याबाबत प्रबोधन केले. जयपाल कांबळे यांनी जांभळी येथे संविधान प्रबोधन व शिव संविधान पत्रकाचे वाटप केले. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन देशभक्त मानवतावादी चळवळीचे कार्यकते निलेश खांडेकर, दीपक कडाळे, अमोल मधाळे, पंचामृत कडाळे, मिलिंद कुरणे, कुमार कांबळे  बसवराज कांबळे यांनी केले.
 यापुढे शिरोळ तालुक्यातील सर्व गावांमध्ये संविधान प्रबोधनाचे कार्य चळवळीच्या वतीने हाती घेण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.