बोरगांव नगर पंचायत ची दुसरी सामान्य सभा खेळीमेळीत संपन्न-सर्कल रुंदीकरण लवकर व्हावे यासाठी नगर सेवक शरद जंगठे सह सर्व नगर सेवकांची मागणी.
बोरगाव नगरपंचायतीची सन 2024 25 सालाच्या दुसरी मासिक सभा नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली.
प्रारंभी मुख्याधिकारी एस.बी.तोडकर यांनी विषय पत्रिकेवरील विषयांची वाचन केले.
बोरगाव शहरात 13 व्यापारी गाळे आहेत .पण या गाळ्यांचे गेल्या अनेक वर्षापासून भाडेवाढ करण्यात आलेले नाही व त्यांचे थकबाकी ही आहे. यांचे थकबाकी वसुली करून गाळे भाडे वाढवण्याचा ठराव करावा असे मुख्याधिकारी तोडकर यांनी सभेसमोर विषय मांडले .यास नगरसेवक प्रदीप माळी,शरद जंगठे सह उपस्थीत नगर सेवक यांनी नकार देत पहिल्यांदा त्या गाळ्यांचे रिपेअर करणे व डागडूज्जी करणे गरजेचे आहे . आधी त्यांना सुविधा पुरवा मग गाळे भाडेवाढ्याचा विचार करा असे सांगितले.
नगरसेवक शरद जंगटे यांनी, बोरगाव शहरासाठी अमृत टू योजना चे काम चालू आहे. पण या योजनेतून किती लोकांना नळ कनेक्शन देण्यात येणार आहे,माहिती अजूनही काही नगरसेवकांना दिलेले नाही.वार्ड नंबर एक मधील कुंभार तळ्या वरील सार्वजनिक शौचालय मंजूर झाले असताना ते इतर ठिकाणी बांधण्यात आले आहे , झालेल्या या प्रकाराची सविस्तर लेखी माहिती द्यावी, तसेच येथील सरकारी महाविद्यालयात असणाऱ्या अडीअडचणी दूर करावे .प्राथमिक आरोग्य केंद्र शेजारी स्वच्छता नाही. अंगणवाडी शिक्षिका अंगणवाडीत वेळेवर हजर राहत नाहीत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच पिण्याच्या पाण्याचा तलाव व कुंभार तलावातील मासेमारीस नवीन टेंडर बोलवणे, व्यापारी गाळे नवीन टेंडर बोलवणे तसेच अनधिकृत बोरवेल कनेक्शन असल्याची यादी करणे व कोणत्याही शासकीय योजनांची माहिती पहिल्यांदा नगरसेवकांना द्यावे व लाभार्थ्यांची निवड व नोकर भरती करताना स्थानिक नागरिकांना प्राधान्य द्यावे,पाणी टाकीतील वाळू लिलाव सर्व नगर सेवकांच्या निदर्शनास आणून करावी ,बोरगाव इचलकरंजी मार्गावरील परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व सुशोभीकरण निर्माण व्हावे या मागणी एकतर्फी पाठिंबा देण्याचे अभिवचन शरद जंगठे यांनी दिले.
नगरसेवक अभय कुमार मगदूम यांनीही, अंगणवाडी शिक्षकांनी वेळेत हजर राहणे गरजेचे आहे. तसेच त्या त्या वार्डातील अंगणवाडी शिक्षकांनी कावीळ, डेंगू बाबत जनजागृती करून नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करावे. शासकीय अधिकारी व नगरसेवकांचा समन्वयामुळे गावचा विकास होत असतो. यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रत्येक महिन्यास नगरसेवकांची भेट घेऊन त्यांना त्या त्या खात्याची माहिती द्यावी असे सांगितले.
यावेळी पशुवैद्यकीय दवाखान्या भोवती कंपाउंड निर्माण,सरकारी महाविद्यालय ठिकाणी मैदान स्वच्छता व कंपाउंड निर्माण करावी तसेच सीसीटीव्ही कॅमेरा बसवावे अशीही मागणी उपस्थित अधिकार्यांकडून करण्यात आले.
नगराध्यक्ष पिंटू कांबळे यांनी, युवा नेते उत्तम पाटील व सर्व नगर सेवक यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास शासनाच्या विविध योजनेतून या ठिकाणी कामे राबविण्यात येत आहेत. मुबलक पाणी ,रस्ते, गटार ,वीज या पलीकडेही जाऊन सार्वजनिक विकास कामांना आपण प्राधान्य देत आहोत .प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत याबाबत कर्मचाऱ्यांनाही सांगण्यात येत असल्याचे सांगितले.
नगरसेविका शोभा हावले यांनी येथील अंगणवाडी शिक्षिका व हेल्पर यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकडे अधिक लक्ष द्यावे. धान्य वाटप करताना मनमनी कारभार न करता प्रत्येकांना शासनाचा योजनेचा फायदा व्हावा यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली.
या सभेस नगराध्यक्ष पिंटू कांबळे,उप नगराध्यक्ष सौ भारती वसवाडे , नगर सेवक अभय मगदूम, शरद जंगठे, माणिक कुंभार,प्रदीप माळी, तुळशीदास वसवाडे, दिगंबर कांबळे,रोहित माने सह सर्व नगर सेविका ,मुख्याधिकारी तोडकर, महसूल ,कृषी, पशुवैद्यकीय ,शिक्षण ,अंगणवाडी , हेस्कॉम, वस्तीग्रह या खात्याचे अधिकारी व नगरपंचायत अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या