नोंदीत कामगारांचे पेंडिग अर्ज ताबडतोब मंजूर करा. - बांधकाम कामगार संघटनेची मागणी.
इचलकरंजी - नोंदीत कामगारांचे पेंडिग अर्ज ताबडतोब मंजूर करा गृह उपयोगी वस्तू संच (भांडी ) अत्यावश्यक साहित्य (पेटी) शिरोळ, इचलकरंजी हातकणंगले चे वाटप इचलकरंजी मध्येच करा या व इतर प्रमुख मागण्यांच्यासाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना ( आयटक) वतिने आज सहाय्यक कामगार आयुक्त मा. जानकी भोईटे यांना शिष्टमंडळ भेटून निवेदन देण्यात आले.
. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये केवळ ठेकेदांरांना पोसनेसाठी वेगवेगळ्या योजना लागू केले आहेत. गेल्या दोन वर्षात प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला आहे व मंडळाचे हजारो कोटी म्हणजे 75 टक्के पैसे ठेकेदारांवर उधळून संपवलेले आहेत. त्याचे ऑडिट होऊन ताबडतोब चौकशी व्हावी. कौटुंबिक नाव वाढवणे आधार कार्ड दुरुस्ती अधिकार जिल्हा केंद्राला मिळावेत , मृत्यू झालेल्या वारसांना ताबडतोब रक्कम मिळावी मॅरेज सर्टिफिकेटची अट काढून टाकावी. गेली वर्षभर इचलकरंजी कार्यालयात विविध लाभ व नवीन नूतनीकरण अर्ज पेंडिंग आहेत ते ताबडतोब निकाली लावावे आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले
. विविध लाभाचे, नविन, नुतनीकरण पेंडिंग काढणे सुरू केले आहे, तर वरिष्ठ पातळीच्या मागण्या कल्याणकारी मंडळाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करतो असे आश्वासन सहाय्यक कामगार आहेत मा. जानकी भोईटे यांनी दिले
. यावेळी कामगार नेते कॉ आनंदा गुरव, रमेश खोत, आयुब मुजावर,जिशान बागायत, सुनील खोत, गणेश मादास, इमरान मुल्ला, रूपेश कांबळे, इकबाल मुल्ला, चंद्रकांत भिसे, सार्थक खामकर, मोहन पन्हाळकर, अविनाश चव्हाण, सुधीर अतीग्रे आदि पदाधिकारी शिष्ट मंडळात होते.
टिप्पण्या