गटकळ करियर अकॅडमी चे घवघवीत यश.
शिवाजी शिंदे
कु. भावना कैलासचंद चौधरी यांची कर सहाय्यक पदी नियुक्ती.
सेलू :सेलू येथील गटकळ अकॉडमीने आपल्या अल्पावधी च्या काळात मोठे नावलौकिक केले.प्रा.रामेश्वर गटकळ व प्रा. दीपक गटकळ यांनी यासाठी दिवसरात्र प्रचंड परिश्रम करीत आपल्या अकॉडमीच्या माध्यमातून विविध क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी विद्यार्थिनीना घडवून मोठ मोठ्या पदावर विराजमान करण्यांचे कार्य केले.यातच काल शुभांगी राऊत हिची पोलिस चालक म्हणून निवड झाली तर आज कु. भावना कैलासचंद चौधरी यांची एमपीएस परीक्षेद्वारे कर सहाय्यक व महसूल सहाय्यक या पदावर नियुक्ती झाली.तिच्या या नियुक्तीमुळे सेलू तालुक्यातील सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत असून गटकळ अकॉडमीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सेलू शहरातील मठगल्ली येथे राहणाऱ्या कु. भावना कैलासचंद चौधरी यांनी सेलू येथील गटकळ अकॉडमी जॉईन करून योग्य मार्गदर्शन घेतले आणि दिलेल्या परीक्षेतील घवघवीत यश संपादन प्राप्त केले.तिला गटकळ अकॉडमी चे संचालक प्रा.रामेश्वर गटकळ, दीपक गटकळ व सर्व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.
टिप्पण्या