खोतवाडी हायस्कूल,खोतवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

हातकणंगले - शांतीसागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था रामानंदनगर,संचलित खोतवाडी हायस्कूल, खोतवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न झाली.या कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने व छ.शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सागर चुडाप्पा,पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमा पुजन संपन्न झाले.यानंतर  विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.यासीन मुजावर सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी माहिती सांगितली व छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्या विषयी माहिती सांगितली. तसेच मुख्याध्यापक श्री.सागर चुडाप्पा सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास,त्यांनी जिंकलेले किल्ले,या विषयी माहिती थोडक्यात आपल्या मनोगतातुन सांगितली.यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिना निमित्त शिवरायांचा जय घोष करत ढोल ताश्यांच्या गजरात शालेय विद्यार्थी-विद्यार्थींची खोतवाडी परिसरातून रैली काढण्यात आली.
       या कार्यक्रमा प्रसंगी विद्यालयातील सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनी, शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी
 उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री.हेमगिरे एस.के. सर यांनी केले.तर आभार सौ.धारवट एम.एम. मॅडम यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.