मलिकवाड येथे वीर सेवा दल शाखा व चेस मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

विशेष प्रतिनिधी अमर माने.-


मलिकवाड, दि. 9 फेब्रुवारी 2025 – वीर सेवा दल शाखा मलिकवाड व चेस मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 15 वर्षाखालील जलद बुद्धिबळ स्पर्धा श्री 1008 मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेसाठी 123 स्पर्धकांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्रातील कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली, इचलकरंजी तसेच कर्नाटकातील बेळगाव, चिकोडी, निपाणी आणि आसपासच्या भागातील खेळाडू सहभागी झाले होते.

*उद्घाटन व स्पर्धेचे आयोजन*

सकाळी 9 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन पुढारी चे वार्ताहर श्री. राजेंद्र केरूरे, लोकमत पत्रकार श्री. मिलिंद देशपांडे, सकाळ पत्रकार श्री. अजित सुतार, श्री. दर्शन उपाध्ये (सहप्रतिष्ठाचार्य), मंदिर कमिटीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र पाटील, सेक्रेटरी आणि मुख्य संयोजक श्री. रावसाहेब कुन्नुरे यांच्या हस्ते पार पडले.

स्पर्धेचे प्रमुख पंच श्री. रोहित पोळ (National Chief Arbiter, Ken Academy, इचलकरंजी) आणि सहायक पंच सलगरे प्रशांत पावले यांनी खेळाडूंना नियमांची माहिती दिली. स्पर्धा 7 फेऱ्यांमध्ये पार पडली आणि संध्याकाळी 5 वाजता निकाल जाहीर करण्यात आला.

*स्पर्धेतील विजेते व बक्षिसे पुढीलप्रमाणे आहेत*

*15 वर्षाखालील गट:*

1. संस्कृती सुतार (नांदणी) – ₹3000/- + ट्रॉफी (सौजन्य: श्री. प्रविण करगे),


2. प्रेम गंगाराम निचल – ₹2500/- + ट्रॉफी (सौजन्य: श्री. प्रविण करगे),


3. अथर्व तावरे – ₹2000/- + ट्रॉफी (सौजन्य: श्री. रणजित देशपांडे),


4. अथर्व सुतार – ₹1500/- + ट्रॉफी (सौजन्य: श्री. सुभाष निलोगी),


5. अर्णव पोरलेकर – ₹1100/- + करंडक (सौजन्य: श्री. शंकर जाधव)

विविध वयोगटातील विजेते:

*7 वर्षांखालील गट:*

1. श्रुत रावसाहेब कुन्नुरे

2. शिवेंद शहाजी पवार

3. सुयोग काकानी

*9 वर्षांखालील गट:*

1. आदित्यराज निंबाळकर

2. हर्ष किशोर मादनाईक

3. सुयान मुचंडीकर

11 वर्षांखालील गट:

1. वरद शहाजी पाटील

2. वरद नरसगोंडा पाटील

3. सर्वेश शहाजी पवार

13 वर्षांखालील गट:

1. शिवम दीर्घ

2. गीतेश सागेकर

3. उर्वा सय्यद


विशेष पुरस्कार:
उत्कृष्ट महिला खेळाडू: आदिया सय्यद
उत्कृष्ट मलिकवाड खेळाडू: रियाज राजू मुल्ला

बक्षीस वितरण व मार्गदर्शन

संध्याकाळी 5 वाजता स्पर्धेचे बक्षीस वितरण International Aditi Brain Academy चे श्री. प्रदीप चौगुले यांच्या हस्ते झाले. त्यांनी खेळाडूंना अबॅकस व ब्रेन जिम याविषयी मार्गदर्शन केले.

या यशस्वी आयोजनासाठी श्री. मिलिंद देशपांडे, श्री. दर्शन उपाध्ये, श्री. राजेंद्र पाटील, श्री. रावसाहेब कुन्नुरे, श्री. बाहुबली कुन्नुरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच विनोद हरोले, आदित्य भेंडीकटगे, प्रथमेश चिंचवाडे यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.