रंगभूमीवर येतंय 'मि. 420' नाटक...  

धमाल, विनोदी असे 'मि. 420' हे नवीन मराठी नाटक आता रंगभूमीवर येत आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सोमवार, १७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता दादरच्या श्री शिवाजी मंदिरात होणार आहे. 
'मि. 420' या नाटकाचे लेखन संतोष जगताप यांनी केले आहे. प्रदीप वेलोंडे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. 
डॉ. संदीप वंजारी, भूषण घाडी, प्रदीप वेलोंडे, निकिता सावंत, अक्षय पाटील, दक्षता जोईल हे कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत. 
महेश देशमाने यांचे संगीत, राम सगरे यांचे नेपथ्य, साई शिर्सेकर यांची प्रकाशयोजना व दत्ता भाटकर यांची रंगभूषा या नाटकाला लाभली आहे. 
या नाटकाची निर्मिती 
'श्री दत्त विजय प्रॉडक्शन' या नाट्यसंस्थेने केली आहे. 
डॉ. संदीप वंजारी व संजय कुमार हे या नाटकाचे निर्माते असून, अरविंद घोसाळकर हे या नाटकाचे सूत्रधार आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.