शिक्षण घेतल्या शिवाय प्रगती नाही : डॉ.प्रताप घोडके.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.

सेलू : सेलू तालुक्यातील घोडके पिंपरी येथे गावातील विवीध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सत्कार समारंभासाठी  आयोजीत कार्यक्रमात डॉ.प्रताप घोडके बोलत असतांना म्हणाले की,दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत जात आहे त्याचबरोबर विभक्त कुटुंब प्रणाली मुळे पूर्वी जी शेतीवर गुजराण होत होती ती आत्ता होणे कठीण जात आहे त्यामुळे दारिन्द्र दूर करण्यासाठी  उच्च शिक्षणाशिवाय प्रगती होणे शक्य नाही त्यामुळे आजच्या काळात शिक्षण घेणे गरजेचे आहे त्याशिवाय कुटुंबाची, देशाची प्रगती शक्य नाही. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जेष्ठ नागरिक पंडितराव घोडके होते.यावेळी सुप्रसिद्ध  उद्धोजक रामप्रसाद घोडके,माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रताप घोडके,माजी जिल्हा परिषद सभापती अशोकनाना काकडे यांची उपस्थिती  होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यामध्ये गुणवत्ता असून योग्य ते मार्गदर्शन आणि पालकांनी लक्ष दिल्यास हे विद्यार्थी यश संपादन करु शकतात असा विश्वास डॉ.घोडके यांनी व्यक्त केला. उद्धोजक रामप्रसाद घोडके,डॉ.प्रताप घोडके,डॉ.रवींद्र घोडके, डॉ.दिगंबर घोडके, डॉ.किरण घोडके,डॉ. पंकज घोडके,डॉ.श्रीनिवास घोडके,डॉ.वैष्णवी घोडके,डॉ.विशाल जाधव,डॉ.माधवी घोडके,डॉ.आकांक्षा घोडके आदी जणांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  गावातील सर्व तरुण युवक युवती, नागरिक आणि महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.