भगवान महावीर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत मुंबईचा यश पाटील विजेता
महावीर महाविद्यालयात आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाला बक्षीस देताना चेअरमन ॲड. के. ए. कापसे. सोबत बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रशासकीय अधिकारी श्री. गणेश अंबरे आणि चेतन माने, मोहन गरगटे, गुणवंत रोटे, प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, प्रा. जयवंत दळवी.
कोल्हापूर : (सुरेश केसरकर)
महावीर महाविद्यालयात गेली ४४ वर्षे भगवान महावीर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा अव्याहतपणे सुरु असून स्पर्धेचे हे ४५ वे वर्ष होते. यावर्षी या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दि. १० फेब्रुवारी रोजी आयोजित या स्पर्धेमध्ये मुंबईच्या यश पाटील याने प्रथम क्रमांक पटकाविला.
४५ व्या भगवान महावीर राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन श्री. आ. दे. शि. प्र. मंडळाच्या संचालिका डॉ. सुषमा रोटे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी वक्तृत्व ही कला असून, ती जोपासणे हे सर्वांची जबाबदारी आहे. महावीर महाविद्यालय गेली ४५ वर्षे ही वक्तृत्व कला जोपासण्याचे कार्य या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहे, असे आपल्या मनोगतात स्पष्ट केले. संस्थेचे चेअरमन ॲड. के. ए. कापसे व बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रशासकीय अधिकारी श्री गणेश अंबरे आणि चेतन माने यांच्या हस्ते विजेत्यांचा रोख रक्कम, शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी चेअरमन ॲड. के. ए. कापसे यांनी वक्तृत्व स्पर्धेतील यशासाठी इच्छा शक्तीला प्रयत्नांची जोड दिल्यास यश हमखास मिळते. मात्र त्यासाठी जबरदस्त उमेद ठेवावी लागेल असे सांगितले.
स्पर्धेचा निकाल प्रथम क्रमांक यश रवींद्र पाटील - बी के बिर्ला कॉलेज, मुंबई. द्वितीय क्रमांक अभय कृष्णकांत आळशी - वझे केळकर कॉलेज, मुंबई. तृतीय क्रमांक प्रज्ञा श्रीकांत माळकर - श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय, सांगली व उत्तेजनार्थ संकेत कृष्णात पाटील - शिवराज महाविद्यालय, गडहिंग्लज. साईराज मोहन घाटपांडे - नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय, पुणे. पूजा भाऊसो साळुंखे - गणपतराव आरवाडे कॉमर्स ऑफ कॉलेज, सांगली.
यावेळी संस्थेचे सचिव मोहन गरगटे, खजानीस गुणवंत रोटे, संचालक प्रदीप पाटील, ॲड. विद्याधर पाटील व श्री आण्णासो अथणे यांची उपस्थिती लाभली.
या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली , सातारा, मुंबई, पुणे, रत्नागिरी येथील स्पर्धकांनी प्रवेश नोंदवून स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला.
स्पर्धेचे संयोजन प्रा. जयवंत दळवी व डॉ. प्रकाश कांबळे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण मिलिंद यादव, एफएम रेडीओ सिटीचे निवेदक ओंकार थोरात आणि प्रा.डॉ.बाळासाहेब सुतार यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. गोमटेश्वर पाटील यांनी करून दिला. संयोजकाचे मनोगत प्रा. जयवंत दळवी यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. संजय ओमासे यांनी मानले. तर सूत्रसंचालन प्रा. संध्या जाधव, प्रा. जावेद मेस्त्री आणि प्रकाश कांबळे यांनी केले.
बक्षीस वितरण समारंभाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पण्या