डॉ. संजय रोडगे यांची संजय गांधी निराधार योजना समितीच्या सेलू तालुकाध्यक्षपदी निवड.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
 

सेलू : (ता. 21) रोजी येथील सेलू तालुका तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये निरंतर निस्वार्थी सेवा करणारे डॉ. संजय रोडगे यांची मा. ना. संजयजी बनसोडे, मंत्री,पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्य तथा पालकमंत्री परभणी, सेलू - जिंतूर विधानसभेच्या लोकप्रिय आ. सौ. मेघनादीदी साकोरे-
बोर्डीकर यांनी तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्ती म्हणून केलेल्या शिफारशी नुसार जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्याकडून संजय गांधी निराधार योजना समितीच्या सेलू तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.या योजने अंतर्गत राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यामध्ये खास करून महिला, बालके, मागासवर्गीय, आदिवासी इत्यादी घटकांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. तसेच राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून विधवा महिला, अनाथ, अत्याचारित महिला, आणि निराधार महिला यांच्यासाठी देखील या योजनेचा लाभ दिला जातो.यावेळी बोलताना डॉ. संजय रोडगे म्हणाले की, मा. ना. संजयजी बनसोडे, पालकमंत्री परभणी, मा. आ. मेघनादीदी साकोरे-बोर्डीकर व जिल्हाधिकारी परभणी  रघुनाथजी गावडे यांनी माझी समितीच्या तालुकाध्यक्षपदी निवड केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले. तसेच समाजातील निराधार व गरजू जनतेची सेवा करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. या योजनेअंतर्गत शेवटच्या घटकापर्यंत लाभार्थ्यांना वेळेवर मदत पोहोचती करण्यासाठी मी कटिबद्ध राहील. या सर्व योजनांची प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवीली जाईल. यामध्ये कुठल्याही दलालांचा हस्तक्षेप किंवा दलालामार्फत लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होणार नाही याची विशेष काळजी समितीमार्फत घेतली जाईल.संजय गांधी निराधार योजना समितीची रचना.
अध्यक्ष, डॉ. संजय रामराव रोडगे, अशासकीय प्रतिनिधी, सदस्य कु. कमल दीपक चव्हाण, तुकाराम नामदेव घनवटे,विलास सोनवणे, विष्णू त्र्यंबक बुधवंत,दत्ता रघुनाथ गिरी, सौ. ज्योती राजेश मोगल दत्तराव ज्ञानोजी जाधव, शासकीय प्रतिनिधी, सदस्य गणेश मंडलिक व  दिनेश झांपले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.