अखेर विनोद बोराडे यांचा नगरसेवकासह राष्ट्रवादीत प्रवेश.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 


 सेलू : दि.07 सेलू नगरपालिकेवर वर्षानूवर्षापासून निर्विवाद वर्चस्व राखणारे माजी नगराध्यक्ष विनोद यांनी आपल्या समर्थकांसह     राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बुधवारी ७ फेब्रुवारी रोजी मुंबईत  प्रवेश केला. गेल्या काही महिन्यांपासून बोराडे हे बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्‍वभूमीवर सत्तारुढ महायुतीतील घटक पक्ष असणार्‍या राष्ट्रवादीच्या अजित दादा पवार गटाच्या ते संपर्कात होते. विशेषतः एक-दोन बैठकीतून बोराडे यांनी दादां बरोबर हितगूजही केले. त्यानंतर समर्थकां बरोबर चर्चा करीत आगामी निवडणूका, त्या अनुषंगाने समीकरणे ओळखून दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचा जवळपास निर्णयही केला होता. त्यापाठोपाठ ते ‘दादां’च्या भेटीच्या प्रतिक्षेत होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी बुधवार 7 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास बोराडे व समर्थकांना मुंबईत वेळ दिला होता. त्या अनुसंगाने आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या भवनात दुपारी साडेचार वाजता आयोजीत कार्यक्रमांत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी   बोराडे व समर्थकांचा राष्ट्रवादीच्या  प्रवेशावर शिक्कामोर्तब करून स्वागत केले. या प्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार बाबाजांनी  दुर्राणी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.बोराडे यांच्या सोबत उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे,माजी नगराध्यक्ष मारोती चव्हाण, साईराज बोराडे,रमेश दौड,सचिन कोरडे,शेख कासीम,शेख आयुब भाई बबन गायकवाड, शेख अन्वर,सतीश जाधव, गौतम धापसे,व्यंकट चव्हाण, लक्ष्मण बुरेवार, राजेंद्र पवार,बाळासाहेब सरकाळे, शेख रौफ नासर पठाण वहीद अन्सारी आदी सह अनेकांची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.