जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खैरी ता. सेलू येथे दप्तरा विना शाळा या उपक्रमास प्रतिसाद.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनीधी परभणी.

एचएआरसी संस्थेचा उपक्रम

सेलू : परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा.या उद्देशाने सदरील कार्यशाळेचे आयोजन (ता. 3फेब्रु.) शनिवार रोजी करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर    मुख्याध्यापक बालासाहेब खवणे,
सहशिक्षक लखन उगीले, श्रीमती प्रेमा मंदाडे ,ज्येष्ठ नागरिक बन्सी गोरे   व कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक तथा कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन बाळासाहेब खवणे यांनी केले. कार्यशाळेत पांडुरंग पाटणकर यांनी कागदकाम ललित कला विषयी माहिती, टाळ्यांचे प्रकार विविध माध्यम प्रिंट,वारली चित्रकला,टाळ्यांचे प्रकार, कोलाज चित्र आणि सुतळी काम या विषयी मार्गदर्शन  केले.
द्वितीय सत्रात शेकोटी कार्यक्रमा वेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तल्लीन होऊन शाळेतील मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लखन उगिले यांनी केले तर आभार श्रीमती प्रेमा मंदाडे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडीच्या मदतनीस आघावताई यांनी सहकार्य केले तसेच सदरील कार्यक्रमासाठी एच ए आर सी संस्थेचे डॉक्टर पवन चांडक आणि प्राध्यापक शिवा आयथॉल यांचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.