कोरेगाव येथे अतिक्रमण करून दवाखाना बांधण्यात आला असून जे बांधकाम केलेली जागा मोकळी करून मिळावी.कोरेगाव आर पी आयची मागणी

कोरेगाव / सातारा - भारती अशोक देडीया यांच्या प्लॉट २१ नंबर मध्ये अमोल मच्छिंद्रनाथ ननावरे यांनी दवाखाना बांधून अतिक्रमण केले असून, व रीतसर नगर पंचायतकडून  परवाना व दुरुस्त अथवा रिव्हाईज केले नसेल तर त्यांना पुर्णत्वाचा दाखला देण्यात येऊ नये याबाबत मा. मुख्याधिकारीसो, नगरपंचायत कोरेगाव यांना आर पी आय कोरेगावच्या वतीने निवेदन देण्यात आले.      
मौजे कोरेगाव, ता. कोरेगाव जि. सातारा भारतीय अशोक देडीया यांचा जुना रेल्वे प्लॉट नं. २१ असून, २०२० साली अमोल ननावरे यांनी देडिया यांच्या प्लॉट नंबर २१ मध्ये दीड दोन फूट आत सरून बेकायदेशिर बांधकाम केले असून सदर जागा देडिया यांची मालकीची असून ती इमारत पूर्णता बेकायदेशीर असून देडिया यांच्या जागेत जेवढी  दीड - दोन फूट जागेत अतिक्रमण केले असून ती जागा मोकळी करून मिळावी.
 अन्यथा येणाऱ्या काळात सातारा जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ व कोरेगाव तालुकाध्यक्ष नितीन बोतालजी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल, याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल. असा इशारा आर पी आयच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी, महिला तालुकाध्यक्ष मनीषा सोनवणे, कोरेगाव शहर अध्यक्ष  शिरीष आवळे, पंकज जावळे, भारती अशोक देडीया, अशोक देडिया, श्रेयस परीट, राज माटोळे, मंगळ बाळू पाटोळे, छाया जावळे, नीलम जावळे, आदींच्या सह्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.