जयसिंगपूर येथील तलाठीसह महसूल सहाय्यक लाचलुचपतच्या जाळ्यात
जयसिंगपूर येथील तलाठी स्वप्नील वसंतराव घाटगे(वव - 39, रा. रुकडी, ता.हातकणंगले) आणि तहसील कार्यालयातील महसूल सहायक शिवाजी नागनाथ इटलावार(वव 32,सध्या रा.कसबा बावडा,कोल्हापूर, मुळ रा. कुंडलवाडी, ता.बिलोली, जि.नांदेड) यांनी सात बारा वर असलेली अडचण दूर करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाल्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उप. आधीक्षक सरदार नाळे यांनी दिली आहे
तक्रारदार यांचे जयसिंगपूर डवरी वसाहतीत 2260 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे. सदर प्लॉट विकणेचा आहे. मात्र, प्लॉटच्या सात बारावर तफावत होती. यामुळे विकताना अडचणी येत होत्या. ती अडचण दूर करण्यासाठी तक्रारदारानं जयसिंगपूर तलाठी स्वप्निल घाटगे यांच्याकडे अर्ज केला होता. सदर अर्ज शिरोळ तालुका तहसीलदार यांच्याकडे पाठवून त्यावर कारवाई होऊन सदर प्लॉट विकण्या योग्य नसल्याचं कळवलं होतं. त्यानंतर सदर प्लॉट विकण्या योग्य करणेकरिता तहसीलदार यांना वीस हजार, महसूल सहाय्यक शिवाजी इटलावार यांना 5000, तर टायपिस्टला अडीच हजार असे एकूण 27500 रु. लाच देण्याची मागणी स्वप्निल घाटगे व शिवाजी इटलावार यांनी तक्रारदार यांच्याकडे केली. याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर यांच्याकडे दिली. त्या अनुषंगानं त्याची पडताळणी केली असता स्वप्नील घाटगे, शिवाजी इटलावार यांनी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झाले याप्रकरणी पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं कारवाई करत दोघांना ताब्यात आहे त्याच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांनी दिली.
टिप्पण्या