दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.


सेलू:- येथील श्रीराम प्रतिष्ठान संचलित ज्ञानतीर्थ माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्याना निरोप समारंभाचा कार्यक्रम दि.15 गुरुवार रोजी    विद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे , संस्था सचिव डॉ.सविता रोडगे शाळेचे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिभाऊ कांबळे, प्राथमिक विद्याल्याच्या मुख्याध्यापिका शालिनी शेळके आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यानी आपल्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून आपली वेगळी छाप उमटवली पाहिजे. जेणेकरून आपल्या शाळेतील इतर विद्यार्थ्यानी तुमचा आदर्श डोळ्या समोर ठेऊन प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या शाळेतील विद्यार्थी हे मोठमोठ्या पदावर रुजू व्हावे जसे कि कलेक्टर,जिल्हाधिकारी, आय.पी.एस, डॉक्टर, वकील, इंजिनियर आदी आणि यापुढे योग्य असे क्षेत्र निवडून तुम्ही सर्व एक आदर्श व्यक्ती बनाल. असा विश्वास या वेळी संस्थेचे अध्यक्ष यांनी आपल्या मनोगातातून व्यक्त केला.इयता दहावीच्या विद्यार्थ्यांना गिफ्ट देऊन नववीच्या विध्यार्थ्यानी स्वागत केले. मुलाच्या मनोरंजनासाठी विविध बैठे खेळ, शेला पागोटेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी इ.१०चा जान्हवी रोडगे, दिव्या निकम, ऋतुजा आघाव, संध्या शिलार या विध्यार्थ्यानी शाळेबद्दल मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमप्रसंगी शाळेतील शिक्षक धम्मपाल ठोके, संदीप आकात, रतन होंडे, विठ्ठल सरकटे, इंद्रजीत मोरे, शशिकांत बिहाडे, गणेश येवले, कारकर सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना मोरे यांने तर आभार सुरभी चव्हाण  यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.