रुग्णवाहिका चालक व वैद्यकीय तंत्रज्ञाच्या कार्यतत्परतेमुळे युवकास जीवदान
मांजरी प्रतिनिधी - (अलका रोडे.) रुग्णवाहिका चालक व वैद्यकीय तंत्रज्ञ यांच्या कार्यतत्परतेने रायबाग येथील अपघातातील जखमी युवकास दवाखान्यात दाखल केल्याने युवकाचे प्राण वाचले रुग्णवाहिका चालक व वैद्यकीय तंत्रज्ञ या दोघांचेही यामुळे कौतुक केले जात आहे
रायबाग येथील नागराळ क्रॉस येथे झालेल्या २७ रोजी संध्याकाळी ४.30 वाजता झालेल्या मोटरसायकल अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला व एक किरकोळ जखमी झाला सगसद्दी गावचे रहीवासी असलेले प्रदीप कनदाळी व माळींगा कनदाळी हे मोटर सायकल वरून जात होते त्यांचे ट्रॅक्टरशी धडक झाली यामध्ये हे युवक जखमी झाले होते स्थानिकांनी अंकली येथील 108 रुग्णवाहिके शी संपर्क साधला असता रुग्णवाहिका चालक शब्बीर सुलेमान मुल्ला व वैद्यकीय तंत्रज्ञ आनंद मंटूर यांनी कार्यतत्परता दाखवत जख्मी युवकांना दवाखान्यात दाखल केले. गंभीर युवकाचा यामुळे प्राण वाचला. रुगणवाहीका चालक व तंत्रज्ञ यांच्या कर्तव्यदक्षतेचा पुन्हा एकदा अनुभव आला त्यांच्या या कार्यकर्ते बद्दल वरिष्ठानकडून तसेच परिसरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
टिप्पण्या