शनिवारी विश्व विजय मानगावे आयोजित जांभळी पट्ट्यावर भव्य बैलगाडीच्या शर्यती

जयसिंगपूर : 
सावकार गणपती प्रतिष्ठाण संचलित सावकार गणपती मंदिर माणगांवेवाडी नांदणीच्या वर्धापन दिनानिमित्ताने विश्व विजय माणगांवे आयोजित भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचा थरार शनिवारी (दि.17  फेब्रुवारी) रोजी सकाळी 9 वाजता जांभळी पट्टा जांभळी-हरोली तालुका शिरोळ येथे पहायला मिळणार आहेत. यासाठी 1 लाख रुपयांचे बक्षिस व डब्बल केसरी पै.चंद्रहार पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक विजय माणगांवे यांनी दिली.
महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील बैलगाडी शर्यत प्रेमीना प्रोत्साहन मिळण्यासाठी तसेच युवा पिढीला बैलगाडी शर्यत पहाता यावी यासाठी स्व.पै.बी.ए.माणगांवे यांच्या प्रेरणेतून या शर्यतीचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. या शर्यती छत्रपती शाहू पश्चिम महाराष्ट्र असोसिएशन यांच्या सहकार्यातून होणार आहेत. यात जनरल बैलगाडी अ गट, बैलगाडी ब गट, दुस्सा-चौस्सा बैलगाडी, आदत बैलगाडी व जनरल घोडागाडीच्या शर्यती होणार आहेत. विजेत्या गाडीला विश्व केसरी शिल्ड व निशान देण्यात येणार आहे. यावेळी  असंख्य शर्यत प्रेमी शेतकरी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असणार आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.