यशवंत विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ.

शिवाजी शिंदे
सेलू तालूका प्रतिनिधी.


सेलू : दि. 24 फेब्रु. शनिवार रोजी इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा यशवंत विद्यालय सेलू, येथे निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाची सुरवात  सरस्वतीच्या प्रतिमेचे  पूजनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक  साईराज मुकेशराव बोराडे सर यांनी स्वीकारले,तसेच विशेष उपस्थिती लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रप्रमुख कन्या प्रशाला सेलू येथील एकनाथ जाधव सर होते.प्रमुख पाहुण्यांनी मुलांना मार्गदर्शन करताना परीक्षासाठी शुभेच्छा दिल्या.यशवंत प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरे सर व यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक थटवले सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांगुळे सरांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ, रेवलकर मॅम,पाचपुते सर,गजभारे सर,मगर सर, बरसाले सर शिसोदे मॅम, सौ. पंडित मॅम, बोराडे सर, ब्रम्हराक्षे सर यांनी विशेष परिश्रम घेतले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.