जादूगार सम्राट शिवम यांच्या फुल टू कॉमेडी व जादूच्या शो ने सेलूकर भारावले.
शिवाजी शिंदे
जादूगार शिवम यांनी पैशाचा पाऊस पाडून केले प्रेषकांना आश्चर्यचकित.
सेलू : दि.२८ फेब्रु. बुधवारी सायंकाळी ७ वा. साई नाट्य मंदिर सेलू येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान सेलू चे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी जादूगार सम्राट शिवम जगप्रसिद्ध यांच्या फुल टू कॉमेडी व जादू शो चे आयोजन केले होते.
या जादू शो ची सुरुवात जादूगार शिवम यांनी डोळ्यावर पट्टी बांधून संपूर्ण सेलू शहरात बाईक चालवून दाखवली आणि प्रेशकांची दाद मिळवली. सोबत श्रीराम प्रतिष्ठान येथील सर्व कर्मचारी यांनी ही विज्ञान दिनानिमित्त बाईक रॅली मध्ये सहभाग नोंदवला.
जादूगार सम्राट शिवम जगप्रसिद्ध यांच्या फुल टू कॉमेडी व जादू या शोचे उद्घाटन श्रीराम प्रतिष्ठान सेलू चे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी संस्थेच्या सचिव डॉ सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, घटक संस्थेचे मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, शालिनी शेळके, अशोक बोडखे आदी मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलन करून मॅजिक शोची सुरुवात होताच सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजू लागले.जादूगार शिवम यांनी आपल्या जादूने सर्व पाहुण्यांना पुष्पहार अर्पण करून व पुष्पगुछ देऊन त्यांचा गौरव केला. प्रत्येक क्षणी सभागृह टाळ्यांचा गजर करत राहिले, असे दृश्य क्वचितच पाहायला मिळते.डॉ. संजय रोडगे यांनी आपल्या भाषणात अनेक वर्षांपासून कला, अभ्यास, विज्ञानाचा प्रचार आणि समाजकल्याणासाठी त्यांनी केलेल्या जादूचे कौतुक करून ते म्हणाले की, सेलूच्या जनतेला एक चांगला कार्यक्रम दाखवल्या बद्दल आम्ही आपले मनापासून कौतुक करतो.या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी, पालक, शिक्षक या सर्वाना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वाना शुभेच्छा देतो.आजच्या जादूच्या फुल टू कॉमेडी शो मध्ये जादूगार शिवम यांनी कधी एका मुलीला स्टेजवर बोलावून तिला हवेत झोकावले तर कधी एका सुंदर मुलीला भयंकर गोरिल्ला बनवून त्याने सर्वांना थक्क केले.कधी कबुतर तयार केले तर कबुतर पासून ससा तयार केला, गरम गरम भजी तयार करून विद्यार्थ्यांना खायला दिली,अनेक गंमतीदार जादुई युक्त्या पाहून भरपूर हशा पिकला, तर शिवम जादूगाराने 500 रुपये नोटांचा पाऊस दाखवून सर्वांना आश्चर्यचकित केले. हा शो बेटी बचाओ बेटी पढाओ, स्टंट अशा अनेक सार्वजनिक संदेशांनी भरलेला होता. विज्ञानवादी व्हा,भोंदू बाबांपासून सावध राहा अशा संदेशांनी भरलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विठ्ठल सरकटे,संचालन संजय ठाकर तर आभार प्रदर्शन डीगंबर टाके यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीते साठी श्रीराम प्रतिष्ठान मधील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
टिप्पण्या