उपजिल्हा रुग्णालय ते निपाणी टाकळी 5 कि.मी रस्त्याचे डांबरीकरण करा.
शिवाजी शिंदे
अनेकदा निवेदन देऊन ही लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष.
सेलू : दि.12 सोमवार रोजी जिंतूर-सेलू मतदारसंघांच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांना भेटून उपजिल्हा रुग्णालय ते निपाणी टाकळी हा 5 कि.मी. चा रोड चे डांबरीकरण पूर्ण करून हा रोड रहदारीस सोईस्कर करावा अशी मागणी लेखी यापूर्वी सेलूतील विविध सामाजिक संघटना,सेलू तालूका दबाव गट,दैनिक एकजूटचे सेलू तालूका प्रतिनिधी शिवाजी शिंदे ,समाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड आदीसह अनेकदा निवेदन देन्यात आले होते. वेळोवेळी लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी जनतेच्या निवेदनाला केराची टोपली दाखविली.वारंवार जनतेमधून मागणी होत आहे याच अनुसंगाने दि.12 फेब्रु.रोजी परत एकदा सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड व निपाणी टाकळी चे रहिवासी तथा शारदा विद्यालय सेलू चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर नावाडे यांच्या सह अनेक लोकांनी सेलू जिंतूर विधान सभेचे आमदार सौ.मेघनाताई बोर्डीकर-साकोरे यांना निवेदन सादर केले या निवेदनात सेलू ते निपाणी टाकळी या 5 कि.मी रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून रखडला आहे.
या रस्त्याची अत्यंत दुरुस्ता झाल्या मुळे याचा प्रचंड त्रास या भागातील निपाणी टाकळी,करडगाव, गोगलगाव,आंबेगाव, ढेंगळी पिंपळगाव, आदी गावासह सेलू येथील शेतकरी, शेतमजूर, शालेय विद्यार्थी, महिला अशा सर्वाना या रस्याचा त्रास होत आहे. या शिवाय या रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालय व नविन बांधकाम होत असलेली शारदा विद्यालय देखील आहे.
हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळेच अती गंभीर रूगांना नाहक 8 कि.मी रस्ता क्रॉस करून गावातून जावे लागत आहे. तरी आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी या अत्यंत आवश्यक असलेल्या रस्त्याच्या दुरूस्ती कडे लक्ष देऊन रस्ता दुरूस्त करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी आमदार सौ.मेघना दीदी यांनी नेहमी प्रमाणे हा रस्ता लवकरात लवकर करू असे आश्वासन दिले आहे. आत्तापर्यंत अनेकदा कोरडे आश्वासन मिळाले आहे .कारण आमदारांनी दैनिक एकजूट चे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांनी निवेदन दिले होते त्यावेळेस सांगितले होते की डिसेंबर महिण्यात त्याचे काम चालू करू.परंतु अद्धयाप पर्यंत काही काम सुरु झाले नाही.म्हणून यावेळेस तरी हा 3 किलो मिटर चा रस्ता पूर्णत्वास जावो हिच अपेक्षा आहे.
टिप्पण्या