जि.प. प्राथमिक शाळा देऊळगाव गात ता. सेलू येथे बाहुलीकाम कार्यशाळा संपन्न.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

एचएआरसी संस्थेचा उपक्रम.

 सेलू : परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचे मोबाईल व्यसन दूर व्हावे व बालकांमध्ये वाचन संस्कृती रुजावी आणि बालकांचा कला विकास मनोरंजक पद्धतीने व्हावा या उद्देशाने सदरील कार्यशाळेचे आयोजन (ता. 9फेब्रु.) शुक्रवार रोजी करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर    मुख्याध्यापक  अंशीराम  ढगे, जेष्ठ शिक्षक अशोक तळोकार,प्रभाकर शिंदे,जगदीश लहाने  व कार्यशाळेचे मुख्य प्रवर्तक तथा कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन अंशीराम ढगे यांनी केले. कार्यशाळेत पांडुरंग पाटणकर यांनी सकाळ सत्रात मुखवटा बाहुली, बोट बाहुली , शाडो पपेट आदी बाहुलीकाम शिकवले . या बरोबरच कागदकाम ललित कला विषयी माहिती, टाळ्यांचे प्रकार विविध माध्यम प्रिंट ,टाळ्यांचे प्रकार , कोलाज चित्र आणि सुतळी काम या विषयी मार्गदर्शन  केले.द्वितीय सत्रात शेकोटी कार्यक्रमा वेळी बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. तल्लीन होऊन शाळेतील मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला. यावेळी 200 विध्यार्थी  सहभागी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्रीमती अनिता मुगुटकर यांनी केले तर आभार  प्रभाकर शिंदे यांनी मानले.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्रीमती प्रज्ञा नवघरे , श्रीमती संध्या जाधव  यांनी सहकार्य केले तसेच सदरील कार्यक्रमासाठी एच ए आर सी संस्थेचे डॉक्टर पवन चांडक आणि प्राध्यापक शिवा आयथॉल यांचे सहकार्य लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.