संपूर्ण जिल्ह्यात जोरदार रास्तारोको.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

ठिकठिकाणी वाहतूक ठप्प : मराठा आरक्षणाकरीता संतप्त प्रतिक्रिया.


परभणी : दि.24सकल मराठा समाजाने सगे सोयर्‍यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करावे या मागणीसाठी शनिवारी (दि.24) पुकारलेल्या रास्तारोको आंदोलनास संपूर्ण जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला.ठिकठिकाण
च्या या आंदोलनात हजारो समाजबांधव सहभागी होते. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गासह राज्य मार्ग तसेच जिल्हांतर्गत मार्गावरील वाहतूक काही तास पूर्णतः ठप्प होती. ठिकठिकाणी दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली.परभणी
तील रास्तारोकोने वाहतूक ठप्प.जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर भागात सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले.त्यामुळे जिंतूर व पाथरी या महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णतः कोलमडली. शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर ठाण मांडून होते. राज्य सरकारच्या विरोधात या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे संपूर्ण परिसर अक्षरशः दणाणला होता.
तालुक्यात अर्धाडझन ठिकाणी रास्तारोको...
परभणी तालुक्यातील झरी तसेच असोला, राहाटी, वाडी दमई व देवलगाव या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. झरीत जिंतूर ते परभणी तसेच वाडी दमईच्या ग्रामस्थांनी झरी ते परभणी, असोला व रहाटीच्या ग्रामस्थांनी परभणी ते वसमत या भागात जोरदार रास्तारोको आंदोलन करीत वाहतूक ठप्प केली. दैठणा, पोखर्णी फाटा या दोन्ही ठिकाणी संतप्त आंदोलन कर्त्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत वाहतूक रोखून धरली.पूर्णा तालुक्यात तीव्र आंदोलन...
पूर्णा तालुक्यातील बहुतांशी मुख्य गावांमधून आंदोलन कर्त्यांनी जोरदार रास्तारोको आंदोलन करीत संपूर्ण तालुक्या तील वाहतूक ठप्प केली. नांदगावात आंदोलनकर्त्यांनी परभणी-वसमत, झिरो फाट्यावरील आंदोलन कर्त्यांनी परभणी- वसमत-पूर्णा या भागातील वाहतूक रोखून धरली. तर देवगाव, नावकी, कात्नेश्‍वर येथील ग्रामस्थांनी तालुका स्थानाकडील वाहतूक थांबवली. माटेगावच्या ग्रामस्थांनी रस्त्यावरच बैलगाड्या सोडून वाहतूक रोखून धरली. तर पिंपळा भत्त्या, चुडावा, खुजडा या ठिकाणीही जोरदार आंदोलन करण्यात आले.पालम व गंगाखेडातही जोरदार प्रतिसाद...सकल मराठा समाजाच्या वतीने पालम व गंगाखेड या दोन तालुक्यातही ठिकठिकाणी जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाने परभणी ते गंगाखेड व गंगाखेड ते लोहा या मार्गावर काही काळ वाहतूक ठप्प होती. तालुक्यांतर्गंत काही खेड्यांमधूनही आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत सरकार विरोधातील रोष व्यक्त केला व वाहतूक ठप्प केली.पाथरी तालुक्यातही वाहतूक ठप्प....या तालुक्यात संतप्त आंदोलन कर्त्यांनी ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलन करीत वाहतूक रोखून धरली. तालुक्यातील वाघाळा फाटा, पोखर्णी फाटा, बाभळगाव फाटा, नाथरा फाटा या ठिकाणी मोठी आंदोलने झाली अशी माहिती पोलिसांनी दिली.मानवत तालुक्यातही उत्स्फूर्त प्रतिसाद....मानवत शहरासह तालुक्यातही सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार रास्तारोको आंदोलन करण्यात आले. महाराणा प्रताप चौकात आंदोलनकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे काही तास वाहतूक ठप्प होती. रत्नापूर, कोल्हा पाटी, रामेटाकळी, मंगरुळ, रुढी पाटील, पाळोदी, पिंपळा फाटा आदी ठिकाणीही आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे पाथरी ते परभणी तसेच पाथरी ते पोखर्णी या महामार्गावरील वाहतूक काही तास ठप्प होती. आंदोलनकर्त्यांनी महसूल व पोलिस यंत्रणेकडे निवेदने सुपूर्त केली.
सेलू तालुक्यातही वाहतूक ठप्प....परतूर ते सेलू, देगाव फाटा ते सेलू तसेच सेलू ते पाथरी या रस्त्यावर संतप्त आंदोलन कर्त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. चिखलठाणा फाटा, रायपूर, जवळा जिवाजी, देगाव फाटा, नागठाणा,. या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी वाहतूक रोखून आपल्या भावना व्यक्त केल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.