सेलू तालूक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने चक्का जाम आंदोलन.
शिवाजी शिंदे
सेलू : दि.16 मराठा समाजाच्या आरक्षणा च्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे, आध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठींबा म्हणून सेलू सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवारी 16 फेबु्रवारी रोजी पुकारलेल्या जेल भरो आवाहनास जोरदार प्रतिसाद मिळाला होता. शहरासह तालुक्यातील सर्व खेड्यातील समाज आणि भागींनीनी स्वतः हजर राहून जेल मध्ये भरती झाले. सेलू शहरात या जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने पुन्हा एकदा रस्ता रोको व चक्का जाम या आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळेच सर्व खेड्या पाड्यातील समाज बंधू आणि भगिनींनी आपले शेतातील व दैनंदिन कामे सोडून या आवाहनास प्रतिसाद देत दि.17 फेब्रुवारी शनिवार रोजी सकाळपासूनच देवगाव फाटा,मोरेगाव, पाथरी रोडवर कुंडी,रेल्वे गेट येथे तर परभणी रोडवर पाणी फिल्टर व गोगलगाव पाटी आदी ठिकाणी सर्व खेड्या पाड्यातील सर्व सकळ मराठा तरुण, वृद्ध, एकत्र जमवून सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह अन्य खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांनी जथ्याजथ्याने येऊन जिंतूर,मंठा,छत्रपती संभाजी नगर मार्गावरील सर्व वाहतूक मोरेगाव व देवगाव फाटा येथे बंद केली.तर परभणी कडे जाणारी सर्व वाहतूक ही गोगलगाव पाटीवर व मदरसा जवळ (पाणी फिल्टर जवळ) राजवाडी येथील सकल मराठा समाजातील तरुणांनी बंद केली.तर गोगलगाव पाटी येथे निपाणी टाकळी, करडगाव,गोगलगाव, ढे.पिंपळगाव, दिग्रस जहांगीर, कवडधन आदी गावातील सकल मराठा समाजातील तरुणांनी एकत्र येऊन बंद केली.तर पाथरी रोडवर रेल्वे गेट व कुंडी पाटीवर सर्व समाज बांधवांनी सर्व वाहतूक बंद केली.एकंदरीत सेलू शहरात येणाऱ्या तालुक्यातील सर्व मार्गावर चक्का जाम आंदोलन करीत समाजाच्या जो पर्यत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन चालूच राहिल अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतल्यामुळे याचा परिणाम सर्वत्र दिसून येत आहे. आज शनिवार सेलूचा आठवडी बाजार असल्याने तालुक्यातील अनेक लोक बाजारात येत असतात पण मराठा समाजाने पुकारलेल्या आंदोलनाला प्रतिसाद देत सर्व शेतकरी बांधवांनी सहकार्य करीत आज आपला शेतमाल विक्रीसाठी आणला नाही. तालुक्यात सर्व ठिकाणी एक मराठा कोटी मराठा म्हणत जरांगे पाटलाच्या आमरण उपोषणाला पाठींबा दिला आहे. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं या घोषणांनी संपूर्ण तालूका दणाणून सोडला. तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून रस्ता रोको व चक्का जाम करून मनोज जरांगे च्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला. दरम्यान, जिल्हा पोलिस यंत्रणेने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वदूर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. सर्व ठिकाणाच्या स्थितीवर नियंत्रण ठेवून होते. त्यामुळे उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ व पोलिस निरीक्षक प्रभाकरराव कवाळे, यांनी चोख व्यवस्था ठेवल्यामुळे कुठे ही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.हजारोंच्या संख्येने हजर असलेल्या मराठा समाज बांधवानी रस्ता रोको व चक्का जाम आंदोलन अतिशय शांततेत आणि संयमाने केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हळ आणि पोलीस निरीक्षक प्रभाकरराव कवाळे यांनी समाधान व्यक्त करून सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन स्वीकारले.व सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त केले.
टिप्पण्या