सेलू शहरात मराठा बंधू भगिनींचे जेल भरो आंदोलन.
शिवाजी शिंदे
सेलू : दि.16 मराठा समाजाच्या आरक्षणा च्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठींबा म्हणून सेलू सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवार 16 फेबु्रवारी रोजी पुकारलेल्या जेल भरो जेल भरो आवाहनास जोरदार प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यातील सर्व खेड्यातील समाज आणि भागींनीनी स्वतः हजर राहून जेल मध्ये भरती झाले . सेलू शहरात या जेल भरो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने या आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळेच सर्व खेड्या पाड्यातील समाज बंधू आणि भगिनी उपस्थित राहून या आवाहनास प्रतिसाद देतील हे अपेक्षितच होते. त्याप्रमाणे शुक्रवार रोजी सकाळपासूनच रायगड चौकापासून ते नूतन महाविद्यालयाचे मैदान येथे एकत्र जमवून सेलू पोलीस ठाणे येथे सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह अन्य खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांनी जथ्याजथ्याने येऊन जेल मध्ये स्वतः भरती करून पोलीस ठाणे दणाणून सोडले. एक मराठा कोटी मराठा म्हणत जरांगे पाटलाच्या आमरण उपोषणाला पाठींबा दिला आहे. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं या घोषणांनी संपूर्ण पोलीस ठाणे दणाणून निघाले. तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून जेल मध्ये जाण्यास संमती देऊन भरती झाले. दरम्यान, जिल्हा पोलिस यंत्रणेने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वदूर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. स्थितीवर नियंत्रण ठेवून होते. त्यामुळे या दरम्यान उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हाळ व पोलिस निरीक्षक प्रभाकरराव कवाळे, यांनी आंदोलकांची चहा पाण्याची चोख व्यवस्था केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.हजारोंच्या संख्येने हजर असलेल्या मराठा समाज बांधवानी जेल भरो आंदोलन अतिशय शांततेत आणि संयमाने केल्याबद्दल उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ओव्हळ आणि पोलीस निरीक्षक प्रभाकरराव कवाळे यांनी समाधान व्यक्त करून सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन स्वीकारले.व सर्व समाज बांधवांचे आभार व्यक्त केले.
टिप्पण्या