हुपरी येथे गिफ्ट गॅलरी व मेडिकल मध्ये घुसला ट्रॉली-ट्रॅक्टर

हुपरी येथे अंबाबाई मंदिर कमानी शेजारी असणाऱ्या सुमित वॉच अँड गिफ्ट गॅलरी व 
कामाख्या मेडिकल मध्ये ब्रेक निकामी झाल्याने ट्रॅक्टर भरधाव वेगाने दारातील कट्टडा तोडून आत मध्ये घुसला वेळप्रसंगी कोणतीही जीवित हानी झाली नाही.
दुपारची वेळ असल्याने मेडिकल बंद असते मात्र सुमित वॉच गिफ्ट गॅलरी चालू असताना 
दुकानाच्या शटर उचकटत वरील पत्रा तोडत मेडिकल व वॉच गिफ्ट गॅलरीच्या मधील सिमेंटच्या पिलरला जोरदार धडक देत 
मोठे नुकसान या ठिकाणी झाले, त्याचा पंचनामा करण्याचे काम हुपरी पोलीस करत होते.
या ट्रॅक्टर ऊस वाहतुकीमुळे हुपरी गावांमध्ये मेन रोड वरून येणारी अवजड वाहतूक बंद करावी 
अशी नागरिकांची मागणी असून यावर नगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी तात्काळ उपाययोजना करून 
मार्चच्या तीन तारखेपासून हुपरीची यात्रा सुरू होणार आहे.
पार्किंगचे व रहदारीचे नियोजन योग्य रीतीने व्हावे इतकेच हुपरीकरांची अपेक्षा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.