सदलगा शहरातील कुयंपु शालेय संकुलात सदलगा शहरातील नवोदित उद्योगपती व सुप्रसिद्ध अशा हॉटेल अमरचे मालक श्री अमरजीत पाटील यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने शालेय विद्यार्थ्यासमवेत मोठ्या उत्साहात साजरा.

सदलगा प्रतिनिधी - सदलगा शहरातील तरुण उद्योगपती व सुप्रसिद्ध अशा पुना बेंगलोर हायवे वरील हॉटेल अमरचे मालक श्री अमरजीत पाटील यांचा पन्नासावा वाढदिवस  शालेय विद्यार्थ्यासमवेत त्यांचे बंधू रणजीत उर्फ मुन्ना पाटील, सुनील पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम, ए पी जे अब्दुल कलाम युवा सेवा संघाचे अध्यक्ष श्री अझरुद्दीन शेखजी, पत्रकार तात्यासाहेब कदम, सामाजिक कार्यकर्ते वशाअल्ला मुजावर, कोयंम्पू प्रशालेचे मुख्याध्यापक श्री जे एस मगदूम सर, मुबारक अत्तार, आकाश जमादार, साई थोरात. शालेय शिक्षिका सौ. एस के व्हंनायक, सौ एस एस चौगुले सौ ए आय पाटील, यांच्या उपस्थितीत प्रशालेतील इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, या वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपयाचे पारितोषिक उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आणि  वाढदिवसानिमित्त शिक्षणासाठी आर्थिक मदत देऊन शिक्षणाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना समजावून दिले.  व  अमरजीत पाटील कुटुंबीयांनी शैक्षणिक मदतीच्या आधारे सामाजिक बांधिलकी जोपासून समाजासमोर एक आदर्श ठेवला.
या शालेय संकुलातील शासनमान्य मराठी शाळा, उर्दू शाळा, कानडी शाळा, ए पी जे अब्दुल कलाम शाळा येथील सर्व विद्यार्थ्यांना मिठाई वाटप करून मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला .याप्रसंगी अमरजीत पाटील प्रेमी मित्र मंडळ, सदलगा शहरातील अनेक मंडळाचे युवक कार्यकर्ते, पालक ,नागरिक .मोठ्या संख्येने उपस्थित होते .याप्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरानी अमरजीत पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी उपस्थित असलेले सुनील पाटील यांचाही वाढदिवस असल्याने त्यांनाही सर्वांनी हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक जे एस मगदूम यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.