अजित पवार गटाला पक्षाचे चिन्ह आणि पक्षही मिळाला, शरद पवार यांना मोठा धक्का

मुंबई - ६ फेब्रुवारी  
राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी कुणाची आणि घड्याळ कुणाचं? हा वाद निवडणूक आयोगात पोहोचला होता. अखेर याचा फैसला निवडणूक आयोगाने केला आहे. अजित पवार गटाला राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळालं आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर विधिमंडळातील संख्याबळाच्या जोरावर एकनाथ शिंदे यांना पक्ष आणि चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिलेला होता. अगदी तसाच निर्णय संख्याबळाच्या जोरावर राष्ट्रवादीबाबतही निवडणूक आयोगाने दिलेला आहे.

शरद पवार गटाला ३ पर्यायी चिन्हे पाठवण्यासाठी ७ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानण्यात येतोय. आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांना त्यांच्या नव्या पक्ष स्थापनेसाठी निवडणूक आयोगाने विशेष सवलत दिली आहे.

बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचं अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगात सांगण्यात आलं होतं. महाराष्ट्रातले ४१ आमदार आणि नागालँडमधील ७ आमदारांचा अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा आहे. तसेच लोकसभेतील २ खासदारांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिलेला आहे तर एका खासदाराने दोन्ही गटाला शपथपत्र दिलेलं आहे. हेच सारं लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे पक्षचिन्ह बहाल केलं आहे. त्यामुळे शरद पवार गटाला सुप्रीम कोर्टात जाण्याचा आता पर्याय असेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.