तारदाळ येथील युवकाचा अनैतिक संबंधातून धारदार शस्राने खूण, तिघांवर गुन्हा दाखल

हातकणंगले - खोतवाडी येथील आरोही बार जवळ तारदाळ, जावाईवाडी परिसरात राहणार्‍या मयुर दिपक कांबळे ( वय 25 ) या युवकाचा तिघा युवकांनी धारधार शस्त्रांनी सपा सप वार करून निर्घूण खुन केला. ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी विनायक संभाजी चौगुले,अंकुश निलेश माने, व रेहान रमजान मुजावर या तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मयुर कांबळे हा तारदाळ येथील जावईवाडी मध्ये राहण्यास आहे. तो हमालीची काम करत होता. मयूर व त्याचा मित्र चव्हाण या दोघांमध्ये गेल्या काही दिवसापासून वादावादीचे प्रकार घडत होते.

गेल्या काही दिवसांमध्ये या दोघांमध्ये मोठा वादही झाला होता. तर शेजाऱ्यांनी व त्याच्या मित्रांनी हा वाद मिटवला होता. पण पुन्हा काल सकाळी वादाचे रुपांतर घडले पुन्हा दोघांची भांडणे मिटवण्यात आली.          त्यातच तारदाळ येथीलच चार युवक एका बार मध्ये दारू पिण्यासाठी बसले होते. यावेळी पुर्वीच्या अनैतिक संबंधातून झालेल्या वादाचा राग उफाळून आल्याने जोरदार वादावादी झाली. यावेळी मारेकऱ्यांनी तलवारी सारख्या धारदार शस्त्रांनी मयुरला गाठून हल्ला चढवला. डोक्यावर, गळयावर, हातावर, पायावर तलवार व चाकूने सपासप वार करण्यात आले.
 मयुर खाली कोसळल्याने मारेकऱ्यांनी दगड घेवून डोक्याचा अक्षरशः चेदां मेंदा केला. त्यामुळे तो जागीच मृत झाला. घटनास्थळी शहापूर पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला असून उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे यांनी घटनास्थळी भेट दिली इंदिरा गांधी रुग्णालयाबाहेर मयूरच्या मित्रमंडळी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.