एल. के.आर. आर प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये मुख्यमंत्री “माझी शाळा सुंदर शाळा” या अभियांतर्गत विविध बँकेला भेट, स्वयंरोजगार शिक्षणाचे महत्त्व.
सेलू : दि. 03 फेब्रुवारी शनिवार रोजी श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल. के.आर. आर प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये मुख्यमंत्री 'माझी शाळा सुंदर शाळा' या अभियांतर्गत विविध बँकेलाभेट,स्वयंरोजगार शिक्षणाचे महत्त्व, ओला कचरा व सुका कचरा व परस बाग इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.आय सी आय सी आय बँक, बँक ऑफ बडोदा, एच डी एफ सी बँक, सेलू तील या तीन बँकांना विद्यार्थ्यांनी भेट दिले.बँकेचे मॅनेजर व कर्मचारी यांनी बँकेतील व्यवहार ज्ञान व आर्थिक ज्ञान याची माहिती दिली.यामध्ये घरासाठी लोन (होम लोन), स्वतःसाठी लोन ( प्रायव्हेट लोन ), चेक न वटणे ( चेक बाउन्स ), धनादेश पडताळणे, धनादेशाची वैधता ( चेक व्हॅलिडीटी ), धाड पडणे ( रेड पडणे) इत्यादींची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. यातून वित्तीय सेवा ची माहिती मुलांना कळाली.'स्वयंरोजगार शिक्षणाचे महत्त्व ' रवळगाव येथील रामकिशन लिंगायत यांच्या 'कुंभार' व्यवसायाची माहिती मुलांना मिळाली. त्यात त्यांनी फुलदाणी, कुंडा, गल्ला, उदानी इत्यादी मातीचे वस्तू मुलांना प्रात्यक्षिक बनवून दाखवले. दत्ता दिगंबर घडे 'सुतार काम' लाकडांच्या फर्निचर संदर्भात मुलांना माहिती दिली. फर्निचरच्या संदर्भात लागणाऱ्या अवजारांचे नावे व त्यांचा उपयोग मुलांना प्रात्यक्षिक करून दाखवले. यातून मुलांना स्वय: रोजगार शिक्षणाचे महत्त्व कळाले.'ओला कचरा व सुका कचरा ' या कार्यक्रमांमध्ये रवळगाव ग्रामपंचायत चे सरपंच दीपक आसाराम रोडगे, सदस्य संतोष भुजंगराव रोडगे व गोविंद रोडगे, प्रवीण रोडगे, अशोक रोडगे, रामेश्वर राऊत, विष्णू मिंड आदि मान्यवर उपस्थित होते. ग्रामपंचायतच्या समोरच विद्यार्थ्यांनी ओला कचरा व सुखा कचरा याचे महत्त्व नागरिकांना समजावून सांगितले. २०१८ साली कचरा रोखण्याचे आव्हान करण्यासाठी पालिका पुढे आली होती. त्यानंतरही आज याची माहिती लोकांना व्हावी यासाठी या कार्यक्रमातून लोकांना कचऱ्यांचे दुष्परिणाम त्याचा उपयोग कसा करावा याची माहिती विद्यार्थ्यांनी
उपस्थिताना दिली.
परस बाग यामध्ये शाळेच्या पाठीमागेच परस बाग लावण्यात आलेली आहे. यामध्ये टमाटर, मेथी, पालक असा विविध पालेभाजा व इतरही फलभाजा लाऊन मुलांना याचे ज्ञान दिले. असे विविध उपक्रम शाळेत घेण्यात आले.
टिप्पण्या