शाळा हीच आमच्या यशाची गुरुकिल्ली-वंदना कुलकर्णी.
शिवाजी शिंदे
सेलू : दि.11फेब्रु. आमच्या यशाच्या,
ध्येयाच्या पाठीशी आमची शाळा, आमचे नूतन कन्या शाळेतील गुरूजन भक्कम पाठीशी होते.त्यांनी दिलेल्या ज्ञानाच्या शिदोरीच्या जोरावरच आम्ही आमचे उचित ध्येय साध्य करू शकलो.नूतन कन्या प्रशालेत 1993 च्या बॅचच्या माजी विद्यार्थीनी वंदना कुलकर्णी यांनी प्रतिपादन केले.नूतन कन्या प्रशालेत 1993 च्या 10 वी च्या batch च्या माजी विद्यार्थीनी मेळावा प्रसंगी विद्यार्थीनी बोलत होत्या.प्रशालेत व्यासपीठावर नूतन कन्या प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मोगल,उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे, नूतन विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक संतोष पाटील,भालचंद्र गांजापुरकर, सेवानिवृत्त शिक्षक नारायण इक्कर यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी प्रशालेच्या जयश्री लोसरवार, अनिता देशमुख, मिनाक्षी काटकर, वंदना कुलकर्णी, मीरा जोशी,मुरारी राजमनी, लता गिल्डा, स्नेहा राठी,मनीषा कुलकर्णी, प्रज्ञा देशपांडे,आश्विनी दांडेकर, सुनीता मालाणी,शेख बेगम यांनी प्रशाले विषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. अतिशय भावनिक वातावरणात हा मेळावा संपन्न झाला.सूत्रसंचालन शशिकांत देशपांडे यांनी तर आभार कीर्ती राऊत यांनी मानले. अनंत बोराडे, सुरेखा आगळे,किशोर ढोके, विनोद शिंदे यांची उपस्थिती होती.
टिप्पण्या