जयसिंगपूरमध्ये रविवारी आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांना विनयांजलीमहाराष्ट्र कर्नाटकमधील श्रावकांची उपस्थीती
जयसिंगपूर, प्रतिनिधी संतशिरोमणी आचार्यश्री १०८ विद्यासागरजी महामुनिराज यांचे डोंगरगड (छत्तीसगड) येथे अत्यंत उत्कृष्ट सल्लेखना पूर्वक समाधी मरण झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र विनयांजली वाहण्यासाठी संपूर्ण देश-विदेशामध्ये एकाच वेळी कार्यक्रम आयोजित केले आहे. महाराष्ट्र व कर्नाटक भागातील सर्व श्रावक-श्राविकांसाठी जयसिंगपूर येथील कल्पवृक्ष गार्डनमध्ये रविवार (ता.२५) रोजी दुपारी १२ वाजता विनयांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी मंगलाचरण, आचार्यश्रीजींच्या प्रतिमेचे अनावरण, दीपप्रज्वलन, प्रास्ताविक, आचार्यश्रीजींचे पूजन, मान्यवरांचे मनोगत, आचार्यश्रीजींची आरती, जिनवाणी स्तुतीने सांगता होणार आहे.
यावेळी आचार्यश्रींच्या अंतिम समयीच्या प्रत्यक्ष घटनांचे साक्षिदार असणारे बालब्रम्हचारी तात्या भैय्या यांच्याकडून आचार्यश्रींच्या समाधीमरणाच्या अंतिमसमयीचा संपूर्ण घटनाक्रम विषद करण्यात येणार आहे.
या विनयांजली कार्यक्रमासाठी सकल दक्षिण वासियांनी मोठ्या संखेने उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या