पत्रकार सुरेश सपकाळ यांना सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित
सांगली शहरातील गणेश मार्केटमध्ये संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीनिमित्त जरवर्षी, सांगलीला चांगली बनवण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तीचा सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यावर्षी सातजणांचा या पुरस्काराने सन्मानित केले. यामध्ये माहिती अधिकार व पत्रकार समितीचे जिल्हाध्यक्ष व न्यूज चॅनलचे सांगली जिल्हा प्रतिनिधी सुरेश सपकाळ यांना सांगली भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये सांगलीचे लाडके, कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे आमदार सुधीर (दादा)गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सांगलीचे उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त वैभव साबळे, महावितरण कार्यकारी अभियंता आप्पासाहेब खांडेकर,माजी महिला बालकल्याण सभापती अस्मिता सलगर,सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे, पोलीस कल्याण निधीचे अभिजित देशमुख,नगरसेवक सुब्राव मद्रासी, गणेश मार्केट चे अध्यक्ष गणेश कोडते, सूत्रसंचालन आदित्यराज घोरपडे, उपाध्यक्ष अल्ताफ शेख, कार्याध्यक्ष संजय शिंदे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या