निपाणी टाकळी येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी.

शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 

सेलू :प्रज्ञासूर्य,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुविद्य पत्नी आणि कोट्यवधी  दिन-दलीत बहुजनांच्या आई माता रमाई आंबेडकर यांची जयंती काल दिनांक ८ फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता निपाणी टाकळी येथे गावकर्यांच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी व्यास पीठावर ऑल इंडिया पॅंथर सेनेचे अध्यक्ष दिपकजी केदार, पॅंथर सेनेचे राज्य  अध्यक्ष विनोद भोळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे उपसभापती प्रकाशजी मुळे,अशोक  उफाडे, सरपंच सुनील सावंत, भिमराव गोटे, जिल्हाध्यक्ष रोहन आकात, तालुक्याध्यक्ष सुधीर सावंत,दगडू गवारे, मान्यवर उपस्थित होते.यावेळी मा.दिपकजी केदार यांनी महापुरूषांच्या जिवन चरीत्रांवर सविस्तर मार्गदर्शन केले.मुख्य कार्यक्रमा नंतर जयंतीनिमित्त शाहीरा प्रज्ञा बंड यांच्या गीतांचा  कार्यक्रम संपन्न झाला.गावातील  महिला,पुरूष,अबाल,वृध्दांसह मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.