पालकांनो सावधान हे ८ दिवस आपापल्या मुलामुलींकडे लक्ष द्या.
आपण जरी जागरूक असलो तरीही शाळा कॉलेज मध्ये हल्ली व्हॅलेंटाईन विक मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात, इंग्रजांनी पेरलेली ही घाण सुज्ञ समाजात जरी दिसत नसली, तरीही शाळा कॉलेज मधील अल्पवयीन नासमज मुलामुलींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे,
या ८ दिवसात तुमच्या मुलामुलींची बॅग तपासा, त्यांच्याकडे लक्ष द्या, त्यांच्याकडे गुलाब, चॉकलेट, तेडिबियर, गिफ्ट आदी गोष्टी दिसतात का ते बघा.
तुमचा मुलामुलींचे शाळा, कॉलेज, क्लासेस चे टाईम वारंवार तपासात रहा, त्याव्यतिरिक्त ते अन्य ठिकाणी कुठे जातात का याची खबरदारी घ्या.
आपल्याला जरी हा बालिशपना वाटत असला तरीही याचं अठवड्याभरात भारतातील लाखो मुली चुकीचा मुलांचा जाळ्यात अडकतात. छोट्याश्या गिफ्ट, चॉकलेट ला भाळून चुकीचा मुलांचा प्रेमात पडतात, म्हणून ८ दिवस वेळात वेळ काढून याची खबरदारी घ्या.
असंख्य मुलींना फसविण्यासाठी चुकीचा लोकांकडून व्हॅलेंटाईन विक चा वापर केला जातो आणि याच आठवड्यात असंख्य मुली त्यांचा जाळ्यात अडकतात.
हि वास्तविकता नाकारता येत नाही. सावधान......!
टिप्पण्या