मातंग साहित्य परिषद, पुणे यांजकडून " हेलपाटा " कादंबरीला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे वाड् मय पुरस्कार 2024 जाहिर ...

कवि सरकार इंगळी

        मातंग साहित्य परिषद - पुणे यांजकडून " हेलपाटा " कादंबरीला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे वाड् मय साहित्य पुरस्कार 2024 जाहीर झाल्याचे संस्थेचे सन्मानिय संस्थापक, अध्यक्ष मा. डाॅ . श्रीयुत धनंजय भिसे सर यांनी जाहीर केले आहे .
       साहित्य क्षेञातील अतिशय मानाचा असा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य वाड् मय पुरस्कार येत्या 11 फेब्रुवारी 2024 रोजी दुसर्‍या मातंगऋषी साहित्य संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक व सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री . मा .श्री गिरीश प्रभुणे सर संमेलनाध्यक्ष व मा. श्री . शंकरशेठ जगताप साहेब स्वागताध्यक्ष व इतर मान्यवर डाॅ धनंजय भिसे सर यांचे उपस्थितित होणार आहे . सदरचे साहित्य संमेलन ' राजवाडा लाॅन्स' काळेवाडी पिंपरी येथे संपन्न होणार आहे . 
      " हेलपाटा " कादंबरीला या  वर्षातला हा तिसरा अतिशय मानाचा पुरस्कार प्राप्त झाला असुन यापुर्वी ' जामनेर येथिल साहित्य संस्कृती मंडळ जामनेर यांचा उत्कृष्ट कादंबरी व संत सावता माळी साहित्य मंडळ वरुड अमरावती यांचा सर्वोउकृष्ट कादंबरी पुरस्कार मिळाला आहे .  या पुरस्कारामुळे सर्वञ " हेलपाटा " कादंबरीचे कौतुक होत असुन " हेलपाटा " कादंबरीवर मान्यवरांकडुन कौतुकाचा वर्षाव होत आहे . त्यामुळे संघर्षमय व हृदयस्पर्शी कादंबरी जनमाणसात अढळ स्थान निर्माण करेल अशी आशा कादंबरीचे लेखक तानाजी धरणे यांना आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.