कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सेलू येथे मंडला आर्ट्स कला कार्यशाळा संपन्न.
शिवाजी शिंदे
ऋतुजा तापडिया यांचे मार्गदर्शन.
सेलू : आज दि. 27 मार्च रोजी 'मंडला आर्ट थेरपी' या कलेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुधारावे, तणाव आणि चिंता दूर व्हावे आणि अभ्यासातील एकाग्रता वाढावी आणि कलेची जोपासना व्हावी या साठी परभणी येथील होमिओपॅथीक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज या संस्थेच्यावतीने बालकांचा कला विकास व्हावा या उद्देशाने सदरील कार्यशाळेचे आयोजन कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सेलू येथे करण्यात आले होते.यावेळी व्यास पीठावर कार्यशाळेच्या मार्गदर्शक ऋतुजा तापडिया, केंद्र प्रमुख एकनाथ जाधव,सेवा निवृत्त ग्रंथपाल डॉ. शिवाजी शिंदे, मुख्याध्यापक वेडे मॅडम, गृहप्रमुख प्रेरणा पवार, मासिक पाळी समुपदेशन तज्ञ डॉ आशा चांडक, सेजल तापडिया, कला शिक्षक पांडुरंग पाटणकर हे उपस्थित होते. कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रप्रमुख व सर्व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत ऋतुजा तापडिया यांनी मंडला आर्ट म्हणजे काय ? त्याचा दैनंदिन जीवनात मानसिक आरोग्य सुधारण्या साठी, दीर्घकाळ स्ट्रेस फ्रीही ठेवण्यासाठी कसा उपयोग होतो याविषयी माहिती दिली. त्या म्हणाल्या "मंडल हा शब्द संस्कृतमधून आला आहे, ज्याचा अर्थ वर्तुळ आहे. ही एक रचना किंवा नमुना आहे ज्याचा इतिहास बौद्ध आणि हिंदू धर्माच्या अध्यात्माशी संबंधित आहे. मंडलाची रचना प्रत्यक्षात विश्वाचे प्रतिनिधित्व करते आणि विश्वातील समतोल चिन्हांकित करते. ज्याप्रमाणे ब्रह्मांड सर्व गोष्टी स्वतःमध्ये सामावून घेते, त्याचप्रमाणे मंडलातील रेषा केंद्रस्थानी एकत्र आलेल्या दिसतात. मंडला आर्ट तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. जेव्हा तुम्ही मंडला आर्ट बनवत असाल, तेव्हा त्यातील बारकावे पाहून संपूर्ण लक्ष त्या कलेवर केंद्रित राहते आणि यामुळे कोर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होते, ज्यामुळे तणाव कमी राहतो."कृतीपूर्ण सत्रातून विविध प्रात्यक्षिके दाखवून उपस्थित विद्यार्थिनी कडून मंडला आर्ट्स साकारले. या सत्रानंतर बालकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. आनंदी होऊन शाळेतील मुलांनी कृतीशील सहभाग नोंदविला. यावेळी 100 विध्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पांडुरंग पाटणकर यांनी केले तर आभार अश्विनी बोराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीते साठी सुमित्रा पवार, अश्विनी बोराडे, योजना कातकडे, बेबी केंद्रे, अनुसया शिंदे, आम्रपाली कांबळे,
शीतल अवचार , सुजाता सेलुकर ,
रावसाहेब पदमपल्ले ,
सुहास नवले यांनी सहकार्य केले तसेच सदरील कार्यक्रमासाठी एच ए आर सी संस्थेचे डॉक्टर पवन चांडक आणि प्राध्यापक शिवा आयथॉल यांचे सहकार्य लाभले.
टिप्पण्या