शुभंकरोती फाउंडेशन व देसाई फाउंडेशन यांचा यशवंत विद्यालय सेलू येथे बाल आरोग्य मेळावा संपन्न.

शिवाजी शिंदे 
जिल्हा प्रतिनिधी परभणी. 


सेलू : दि. 18 मार्च रोजी यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सेलू संचलित यशवंत प्राथमिक शाळा व यशवंत विद्यालय सेलू येथे शुभंकरोती फाउंडेशन व देसाई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय बाल आरोग्य मेळावा घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मुकेश हरिभाऊ काका बोराडे, शुभंकरोती फाउंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी,निशिगंध पाटील सर, यशवंत प्राथमिक व माध्यमिक चे मुख्याध्यापक रामप्रसाद गोरे व रतन थटवले सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.शुभम करोति फाउंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी सर्व वर्गाची वर्ग सजावट करून शैक्षणिक वातावरण तयार केले व आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यां मध्ये शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक, शारीरिक व मानसिक सृजनात्मक विकास होण्यासाठी आमची संस्था मराठवाड्यात काम करत आहे.अशी माहिती दिली. शिबिरा मध्ये प्रशालेतील वर्ग पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. प्रत्येक वर्गात विविध शैक्षणिक उपक्रम व खेळ घेण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष मुकेश हरिभाऊ काका बोराडे यांनी शुभम करोती फाउंडेशनचा उपक्रम हा विविध खेळाद्वारे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणारा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारा कृतिशील उपक्रम आहे. असे अध्यक्षीय समारोपामध्ये आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार प्रशालेतील सहशिक्षक  विष्णू वामन सर यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत प्राथमिक विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, शुभम करोती फाउंडेशनचे सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.