खोतवाडी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा थकीत वेतन मिळण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा परीषद समोर बोंब ठोक आंदोलन

हातकणंगले वृत्तसेवा - मोजे खोतवाडी येथील ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी यांना मागील आठ महिन्यापासुन वेतन मिळालेले नाही. तसेच कामगारांचा फंड अद्याप भरलेला नाही. त्याचप्रमाणे वाढीव पगाराचा फरक मिळालेला नाही. मयत कामगार व सेवानिवृत्त कामगार यांना कोणताही फंड, फरक, सव्हिस दिलेला नाही. मागील ७ ते ८ वर्षापासून कामगारांचा होणाऱ्या छळाबद्दल न्यायाच्या मागणीसाठी दलित समाज विकास परिषदेच्यावतीने दि. ३१/०१/२०२०२३ रोजी गटविकास अधिकारी हातकणंगले यांच्या कार्यालयावर उपोषण केले होते. त्याठिकाणी गटविकास अधिकारी व ग्रामसेवक उपोषण सोडण्यासाठी झालेली चर्चा करुन ग्रामपंचायत खोतवाडी यांचेकडील चेक देवुन उपोषण सोडण्यास सांगितले त्यांनी ३ चेक कामगारांना दिले. त्यापैकी एक चेक कामगारांनी वर्तवला त्यामध्ये ९ महिनेपैकी ३ महिनेचा पगार जमा झाला व उर्वरीत दोन चेक ग्रामसेवक खोतवाडी यांनी पैसे जमा करतो म्हणुन परत घेतले, तेव्हापासुन आजअखेर परत ८ महिन्याचा पगार थकीत आहे. फंड व फरक व मयत कामगार व सेवानिवृत्त कामकार यांना कोणताही फंड व सर्व्हिस परत दिलेली नाही. सदर बाब ही ग्रामसेवक यांना विचारली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देणे चालु केली आहेत. तरी सदर घटनेचा निषेध म्हणुन दलित समाज विकास परिषदेच्यावतीने दि. ०७/०३/२०२०२४ रोजी शासनाला जाग आणण्यासाटी जिल्हा परिषद, कोल्हापुर यांचे समोर बोंब टोक आंदोलन करण्यात येणार असलेचे निवेदन शहापूर पोलिस,मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.कोल्हापूर,कामगार आयुक्त इचलकरंजी,ग्रामपंचायत खोतवाडी,हातकणंगले पोलिस,गटविकास अधिकारी हातकणंगले यांना देण्यात आले आहे.या निवेदनावर रविंद्र तिवडे (पश्चिम महाराष्ट्रअध्यक्ष  विकास परिषद), सुनिल लोखंडे -  कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, योसेफ आवळे. राज्यअध्यक्ष दलित विकास परिषद आदींच्या सह्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.