सैनिकीमुळे मलिकवाड गावचे नाव उज्जवल.,खास. अण्णासाहेब जोल्ले यांचे मत.,जयहिंद असोसिएशन कमानीवर जवान मुर्ती प्रतिष्ठापना

मलिकवाड प्रतिनिधी : अमर माने - 
मलिकवाड मधिल गेले  पिढया अन पिढया देश सेवेसाठी झटत असलेल्या चिक्कोडी तालुक्यातील एकमेव गाव म्हणून  ओळखले जाणारे सैनिक मलिकवाड गावचे नाव नावा रूपाला आणले आहे. आज देखील प्रत्येक वर्षी तीन ते चार युवक सैन्यात भरती होऊन गावचे नाव रोशन केले आहे. त्यासाठी त्याला माजी सैनिक, असोसिएशनचे पदाधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन  ठरत असल्याचे मत चिक्कोडी लोकसभेचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी व्यक्त केले. ते जयहिंद असोसिएशन स्वागत कमानीवर जय जवान जय किसान जवान मूर्तीचे प्रतिष्ठापना करून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण उंदूरे होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता इंगळे, उपाध्यक्ष संभाजी पाटील, सुनीलराव देशपांडे, महादेव रायजाधव जवान मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाला प्रारंभ देऊन दीपप्रज्वलन करण्यात आले.

श्री. जोल्ले पुढे म्हणाले, या छोट्याशा गावातील लोक व प्रत्येक घरातील एक व्यक्ती सैन्यात भरती होऊन देशाचा अभिमान वाढवितो आहे. यापुढे आणखीन देश सेवेसाठी युवकांनी सहभाग व्हावे. संघटनांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पुढाकार घ्यावे. त्यासाठी जोल्ले ग्रुप सदैव मदत करण्यास तयार आहेत.असोसिएशनचे अध्यक्ष लक्ष्मण उंदूरे यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी हाल शुगरचे संचालक शरद जंगटे, डॉ.मिथुन देशपांडे, प्रकाशराव देशपांडे, अण्णासो पाटील, डी.जी. नाईक, दिनकर गुडे, श्रीकांत सुतार, दादासो कोळी यांच्यासह, जयहिंद असोसिएशनचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.बी. केरुरे यांनी केले तर पी.एच. पाटील यांनी आभार मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.